छत्तीसगडमध्ये महिला न्यायाधीशांची आत्महत्या.

46

छत्तीसगडमध्ये महिला न्यायाधीशांची आत्महत्या.

छत्तीसगडमधील मुंगेली येथे तैनात असलेल्या जिल्हा व सत्र न्यायाधीश कांता मार्टिन यांनी रविवारी आत्महत्या केली. त्यांनी स्वत:च्या घरामध्ये साडीला गळफास घेऊन आत्महत्या केली.

छत्तीसगड :- गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या आत्महत्यांच्या  सत्रांमुळे देश ढवळून निघाला आहे. त्यात आज पुन्हा एकदा अशीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्तीसगडमधील मुंगेली येथे तैनात असलेल्या जिल्हा व सत्र न्यायाधीश कांता मार्टिन यांनी रविवारी आत्महत्या केली. त्यांनी स्वत:च्या घरामध्ये साडीला गळफास घेऊन आत्महत्या केली.

छत्तीसगडच्या मुंगेली जिल्ह्याच्या जिल्हा आणि सत्र न्यायधीश कांता मार्टिन यांनी रविवारी आपल्या सरकारी निवासस्थानात साडीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.

जिल्हा आणि सत्र न्यायाधीश म्हणून कार्यरत मार्टिन या आपल्या बंगल्यात एकटय़ाच राहायच्या. एकटेपणामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याने त्यांनी आपले जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला असावा असा अंदाज पोलिसांनी प्राथमिक तपासातून बांधला आहे.

या घटनेनंतर छत्तीसगडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. न्यायाधीश मार्टिन यांच्या पतीचे दीड वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्यांचे दोन मुलगे सध्या दिल्ली आणि रायपूर येथे राहतात.