नागभीड येथे क्रांतिकारी बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी.

✒️अरुण भोले✒️
नागभीड तालुका प्रतिनिधी
94033 21731
नागभीड :- नागभीड येथे बिरसा विचार मंच नागभीडच्या वतीने क्रांतिकारी बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. नागभीड येथील तेली समाज सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.क्रांतिकारी बिरसा मुंडा यांची १४६ वी जयंती निमीत्याने बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अरुण पेंदाम सामाजीक कार्यकर्ते तथा ग्रामगीता प्रचारक हे होते. तर उद्घाटक म्हणून डाँ.पेनकर हे होते. या कार्यक्रमला प्रमुख पाहुने म्हणून पंजाबराव गांवडे माझी जि.प. सदस्य, देवानंद कोवे माझी पं.स.सदस्य, दिलीप कोडापे, आर.डी.रामटेके, सुनीता पेंदाम, प्रीती पेनकर, डाँ.कोब्रा, शहाने आदी उपस्थित होते. यावेळी मंचावरुन डाँ.पेनकर, पंजाब गांवडे, दिलीप कोडापे, डाँ.कोब्रा यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण पेंदाम म्हणाले की, बिरसा मुंडा यांचा जन्म गरीब कुंटुबात झाला.त्यांनी स्वातंत्र्यासाठी व ब्रिटिशा विरुद्ध बंड पुकारले आणी ते जनक्रांतीनायक झाले. बिरसा मुंडा हे निसर्गप्रेमी होते. ते निसर्गावर प्रेम करायचे. जल, जंगल, संपत्ती ही मुळच्या आदीवासीची आहे. आदीवासीची संकृती ही ईतरापेक्षा वेगळी आहे. आम्हाला आपल्या संकृतीचे जतन करायला पाहीजे. भारतीय संविधानाच्या अनुसुची ५व ६ नुसार या देशातील संपत्ती ही आदीवासीची आहे. संविधानाने ३४२ व्या कलमानुसार आम्हाला खुप काही दिले. त्या संविधानाचे रक्षण करणे आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे.
आदीवाशीची संकृती ही देशातील मुळची संकृती आहे. आमची संकृती ईतरापेक्षा वेगळी आहे. आपल्याला आपल्या संकृतीचे जतन करायचे आहे. ही संकृती कोणीच बदलवु शकत नाही. यावेळी मंचावर आर.डी.रामटेके, पंजाबराव गांवडे, डाँ. पेनकर, अरुण पेंदाम याःचा शाल व श्रिफळ देवुन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन तुळशीदास कुळमेथे यांनी केले.