गोंडपिपरी तालुका भाजपाला पडली खिंडार…* *भाजपा नेते निलेश संगमवार, माजी बांधकाम सभापती राकेश पुन,भाजपा कार्यकर्ते सुनील भाऊ फुकट यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश*

51

*गोंडपिपरी तालुका भाजपाला पडली खिंडार…*

*भाजपा नेते निलेश संगमवार, माजी बांधकाम सभापती राकेश पुन,भाजपा कार्यकर्ते सुनील भाऊ फुकट यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश*

गोंडपिपरी तालुका भाजपाला पडली खिंडार...* *भाजपा नेते निलेश संगमवार, माजी बांधकाम सभापती राकेश पुन,भाजपा कार्यकर्ते सुनील भाऊ फुकट यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश*
गोंडपिपरी तालुका भाजपाला पडली खिंडार…*
*भाजपा नेते निलेश संगमवार, माजी बांधकाम सभापती राकेश पुन,भाजपा कार्यकर्ते सुनील भाऊ फुकट यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश*

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी -:दि.१६ नोव्हेंबर;

राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय विकासपुरुष आमदार मा.श्री.सुभाषभाऊ धोटे यांच्या भरीव कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून व तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे देवदूत श्री.देविदासभाऊ सातपुते यांच्या समवेत गोंडपिपरी तालुका भाजपा नेते श्री. निलेशभाऊ संगमवार, माझी बांधकाम सभापती श्री. राकेशदादा पुन व भाजपा कार्यकर्ते श्री.सुनीलभाऊ फुकट यांनी आज काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
तालुका विकासाच्या दृष्टिकोनातून विधानसभेवर लाभलेले कार्यक्षम आमदार श्री. सुभाषभाऊ धोटे यांची तालुक्यासह विधानसभेत विकास पुरुष अशी प्रचिती असून तालुक्याचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. यातच आमदारांची विकास कामांची भरीव गती बघता तालुक्यात काँग्रेसची प्रबळता अत्यावश्यक आहे.
देशातील केंद्र सरकारची चाललेली महागाई व हुकूमशाही प्रक्रिया खोडून काढण्यासाठी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून व अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष मा. सोनियाजी गांधी यांचे हात बळकट करण्याकरिता व राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्री. सुभाषभाऊ धोटे यांच्या भरीव कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून व आमदारांचे हात अधिक मजबूत करण्यासाठी आज गोंडपिपरी तालुक्यातील भाजपाचे विश्वासार्ह कार्यकर्ते श्री. निलेशभाऊ संगमवार, राकेशदादा पुन व सुनीलभाऊ फुकट यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
राजुरा नगराध्यक्ष श्री. अरुण भाऊ धोटे तसेच तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष व पोडसा गावचे सरपंच आणि तालुक्यात सर्वसामान्यांसाठी धाऊन जाणारा देवदूत म्हणून प्रसिद्ध असलेले आदर्शव्यक्ती श्री. देविदासभाऊ सातपुते यांचे समवेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.