नागपुरातून धावणार आठ पॅसेंजर रेल्वेगाड्या. दैनंदिन पॅसेंजर गाड्या सुरू करण्याचा आदेश जारी.

23

नागपुरातून धावणार आठ पॅसेंजर रेल्वेगाड्या. दैनंदिन पॅसेंजर गाड्या सुरू करण्याचा आदेश जारी.

नागपुरातून धावणार आठ पॅसेंजर रेल्वेगाड्या. दैनंदिन पॅसेंजर गाड्या सुरू करण्याचा आदेश जारी.
नागपुरातून धावणार आठ पॅसेंजर रेल्वेगाड्या. दैनंदिन पॅसेंजर गाड्या सुरू करण्याचा आदेश जारी.

युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲 95275 26914 📲
नागपूर:- कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने काही गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. मध्य रेल्वे नागपूर विभागांतर्गत धावणाऱ्या आठ अनारक्षित दैनंदिन पॅसेंजर गाड्या सुरू करण्याचा आदेश जारी केला. यामध्ये भुसावळ – खंडवा, बडनेरा – नरखेड नागपूर – आमला, आमला-इटारसी, अमरावती – बडनेरा आणि आमला – छिंदवाडादरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. तब्बल 20 महिन्यांनंतर सुरू होणाऱ्या गाड्या पुढील आदेशापर्यंत सुरू राहणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून रेल्वे मंत्रालयाने पॅसेंजर गाड्या सुरू केल्यामुळे प्रवाशांना फायदा होणार आहे.

गाडी क्रमांक ०११८३ भुसावळ-इटारसी १५ नोव्हेंबरपासून, ०११८४ इटारसी-भुसावळ १९ नोव्हेंबरपासून, ०१३६५ भुसावळ-बडनेरा १५ नोव्हेंबरपासून आणि ०१३६६ बडनेरा-भुसावळ १७ नोव्हेंबरपासून, ०१३६७ बडनेरा-नरखेड, ०१३६८ नरखेड-बडनेरा १५ नोव्हेंबरपासून आणि ०१३६९ बडनेरा-नरखेड, ०१३७० नरखेड-बडनेरा १६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. गाडी क्रमांक ०१३२३ नागपूर-आमला आणि ०१३२४ आमला-नागपूर १८ नोव्हेंबरपासून धावणार आहे. ०१३१८ इटारसी-आमला १६ नोव्हेंबरपासून व ०१३१७ आमला-इटासरी १९ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. ०१३७१ अमरावती-वर्धा १६ नोव्हेंबरपासून आणि ०१३७२ वर्धा-अमरावती १७ नोव्हेंबरपासून, ०१३१९ आमला-छिंदवाडा, ०१३२० छिंदवाडा-आमला १७ नोव्हेंबरपासून आणि ०१३७९ बडनेरा-अमरावती १६ नोव्हेंबरपासून आणि ०१३८० अमरावती-बडनेरा १७ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. सर्व पॅसेंजर गाड्यांमध्ये कोरोनानियमांचे पालन करणे आवश्यक आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.