एसटी कामगारांचे निलंबन मागे घ्या, समता सैनिक दलाची मागणी.

52

एसटी कामगारांचे निलंबन मागे घ्या, समता सैनिक दलाची मागणी.

एसटी कामगारांचे निलंबन मागे घ्या, समता सैनिक दलाची मागणी.
एसटी कामगारांचे निलंबन मागे घ्या, समता सैनिक दलाची मागणी.

✒ प्रशांत जगताप ✒
कार्यकारी संपादक (मिवान्यु)
📲 9766445348📲

वर्धा:- राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी संपावर असलेल्या कामगारांचे निलंबन मागे घेण्याबाबतची मागणी समता सैनिक दलाच्या वतीने विभागीय नियंत्रक रापम, वर्धा यांच्यामार्फत परिवहन मंत्री अनिल परब यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचा विविध विलनीकरण्याच्या मागणीसाठी संप सुरू आहे. परंतु महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप बेकायदा दर्शवित निलंबनाची कारवाई करून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे.त्यामुळे महाराष्ट्रात ९१८ तर जिल्ह्यात आजपर्यंत ५३ कर्मचारी निलंबित करण्यात आले. हे अत्यंत निंदनीय व निषेधार्ह आहे.

राज्य परिवहन महामंडळाचे महाराष्ट्र शासनामध्ये विलनीकरण करावे आणि इतर न्यायपुर्ण मागण्यांकडे शासन हेतूपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. तुटपुंज्या वेतनामुळे एस.टी.कर्मचाऱ्यांना सामान्य जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक कामगारांनी मागील काही दिवसात आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. अशा परिस्थितीत न्याय मागणाऱ्या कामगारांवर गुन्हे दाखल करून निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

राज्याची जीवन वाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गावखेड्यातील प्रवासी वर्ग प्रवासासाठी एसटी वरच अवलंबून आहे. अनेक विद्यार्थ्यांचे शाळेत न पोहचल्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. थंडीचे दिवस व दिवाळीच्या दिवसात प्रवाशांना ने-आण करण्याकरिता वाहन नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत.

त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आंदोलनकर्त्या कर्मचारी वर्गावरील निलंबनाची कारवाई त्वरित मागे घेऊन राज्य परिवहन महामंडळाचे महाराष्ट्र शासनामध्ये विलीनीकरण करावे आणि इतर मागण्या मान्य करून एसटी कामगारांना न्याय द्यावा अशी आपणास समता सैनिक दलाच्या वतीने या निवेदनातून मागणी करण्यात येत आहे.

संपावर असणा-या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्यास समता सैनिक दलाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि या दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील. यावेळी वर्धा जिल्हा संघटक अभय कुंभारे, जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीप कांबळे,गणेश खेलकर,पप्पू पाटील, चंदु भगत, अमोल ताकसांडे, आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.