भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक व पुतळा प्रेरणादायी ठरेल!* *माजी जि. प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचे प्रतिपादन* *जिवनगट्टा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी* *स्मारक व पुतळ्याचे शाही थाटात लोकार्पण* *सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण*

52

*भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक व पुतळा प्रेरणादायी ठरेल!*

*माजी जि. प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचे प्रतिपादन*

*जिवनगट्टा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी*

*स्मारक व पुतळ्याचे शाही थाटात लोकार्पण*

*सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण*

भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक व पुतळा प्रेरणादायी ठरेल!* *माजी जि. प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचे प्रतिपादन* *जिवनगट्टा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी* *स्मारक व पुतळ्याचे शाही थाटात लोकार्पण* *सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण*
भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक व पुतळा प्रेरणादायी ठरेल!*
*माजी जि. प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचे प्रतिपादन*
*जिवनगट्टा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी*
*स्मारक व पुतळ्याचे शाही थाटात लोकार्पण*
*सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण*

*अमोल एन रामटेके अहेरी तालुका प्रतिनिधी,9405855335*

*एटापल्ली:-* आदिवासी समाजक्रांतीचे जनक, लोकनायक भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक व पुतळा प्रेरणादायी ठरेल व क्रांतीची मशाल तेवत राहील असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले.
ते सोमवार 15 नोव्हेंबर रोजी एटापल्ली तालुक्यातील जिवनगट्टा येथे बिरसा मुंडा गोटूल समितीच्या वतीने बिरसा मुंडा स्मारकाचे अनावरण आणि बिरसा मुंडा जयंती तथा कोया पूनेम गोंडी संस्कृती संम्मेलनात उदघाटनीय स्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी हिचामी होते तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून लक्ष्मण नरोटी, माजी सभापती बेबीताई लेकामी, ललिता मडावी, शंकर आत्राम, राजू नरोटी, देवाजी अरमा, सत्यनारायण कोडापे, प्रा.चिन्ना पुगाटी, ऍड. किशोर पुंगाटी, दौलत दहागावकर, रामजी कत्तीवार आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम आदिवासी संस्कृती व परंपरेनुसार मिरवणूक काढून सप्तरंगी ध्वजाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण आणि भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक व पुतळ्याचेही शाही थाटात लोकार्पण करण्यात आले.
पुढे उदघाटनीय स्थानावरून बोलतांना माजी जि. प.अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम म्हणाले की, ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यात बिरसा मुंडा यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. आदिवासी समाजात जल, जंगल, जमिनीची लढाई जुनी असली तरी भगवान बिरसा मुंडा यांनीही उठाव करून लढा दिले. इतकेच नव्हे तर आदिवासी हक्क, शिक्षणाचे महत्त्व, स्त्री स्वातंत्र्य , मानवी प्रतिष्ठा यासाठीही बिरसा मुंडा यांनी लढा दिले त्यांची एक ऐतिहासिक चळवळ असल्याचे म्हणत पुढे त्यांनी, गौरव व अभिमानाची बाब म्हणजे आदिवासी समाजातील एकमेव भगवान बिरसा मुंडा यांचे तैलचित्र भारतीय संसदेच्या मध्य कक्षासमोर लावले आहे. ती प्रेरणा घेऊन सर्वांनी दर्जेदार शिक्षण व एकसंघटिपणे संघर्षं करून समाजाचे सर्वांगीण विकास साधावे असे आवाहन माजी जि. प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी करून भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक व पुतळा हे एकादृष्टीने यशोगाथाचे प्रतीक असून येणाऱ्या भावी पिढीसाठीसुद्धा प्रेरणादायी, क्रांती आणि विकासाची मशाल सदोदित तेवत राहील असा विश्वास व्यक्त करून मोलाचे मार्गदर्शन यावेळी भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले.
तसेच अन्य मान्यवरांनी सुद्धा भगवान बिरसा मुंडा यांच्या ऐतिहासिक कार्यावर व जीवनावर प्रकाश टाकून आपले विचार व मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवाजी अरमा यांनी केले. तर सूत्रसंचालन उमेश नरोटे यांनी केले उपस्थितांचे आभार भिवाजी कुरेटी यांनी मानले. यावेळी विविध गावातील बहुसंख्येने समाज बांधव व प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.