नागभीड चे पोलीस निरिक्षक मा,प्रमोद मडामे अवघ्या 10मिनीटांत चोरीचा गुन्हा पकडला

✒अरुण रामुजी भोले✒
नागभीड तालुका प्रतिनिधि
9403321731
नागभीड : -तक्रारदार महिला नामे सौ लता तुळशीदास मसराम वय 36 रा गडचिरोली ,व्यवसाय-अंगणवाडी सेवीका,ह्या दि 14/11/2021 ला खाजगी ट्रॅव्हल्स बसने काम्पा ते ब्रम्हपुरी असा प्रवास करत असतांना दुपारी 3 ते साडेतीन वाजता दरम्यान, प्रवासादरम्यान गर्दीमध्ये सदर तक्रारदार महिलेचे हँडबॅग मधून 18 ग्रॅम कि 63,000/- रु.ची चोरीस गेली ,बस नागभीड येथे येताच सदर बाब तक्रारदार महिला हिचे लक्षात येताच बसमधील लोकांनी पोलीस स्टेशनला माहिती देताच ड्युटीवरील पोलीस अंमलदार सफौ संजय पोंदे ,पो ना कुमोद खनके व महिला पोलीस यांनी तात्काळ बसस्थानकावर जावून सदर बसमधून उतरून दुस-या बसमधून जात असलेल्या ,सोबत लहान बाळ व छोटी मुलगी असलेल्या संशयीत महिलेस ताब्यात घेवून महिला पोलीसकडून तिची झडती घेतली असता सदर महिलेकडे चोरीस गेलेली सोन्याची पोत मिळून आली ,
सदर महिलेचे नाव नान्नू रोहित दुनाडे वय 25 रा रामेश्वरी रींगरोड नागपूर असे आहे,
सदर प्रकरणी कलम 379 भा द वी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर महिलेस अटक करण्यात आली असून पुढील तपास पो हवा भेंडारे करत आहेत
पुढील तपास सफौ संजय पोंदे करत आहेत,