काटोल येथील एसटी कामगार आंदोलनाला माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांची भेट.

✒ युवराज मेश्राम ✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
📲 9766445348 📲
काटोल:- पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांनी काटोल एसटी कामगाराचे सुरु असलेल्या आंदोलनाला आंदोलनस्थळी जाऊन भेट दिली.
यावेळी प्रा. कवाडे सर म्हणाले एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे नियम लागू व्हावे. एसटी महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण व्हावे. या मागणीसाठी कामगारांनी ज्याप्रमाणे आक्रमक पवित्रा घेतला व त्यांच्या या संपाला आमचे जाहीर समर्थन असून आज तुम्ही मंडप मध्ये आंदोलन करीत आहात. उद्याला जर रस्त्यावर आले तर आम्ही मात्र त्यांचे अवश्य समर्थन करू आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते तुमच्या पाठीशी आहेत. सर्व कर्मचारी चालक, वाहक व मेकॅनिक वर्कशॉप मधील सर्व कर्मचारी सहभागी व्हावे व या आंदोलनाला उग्र करावे असेही ते म्हणाले.
यावेळी आंदोलन करतांना आत्महत्या करू नका आंदोलन शांततेने मार्गाने करा असे ते म्हणाले आत्महत्येने प्रश्न सुटत नाही. गेल्या नऊ दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे महाराष्ट्रातील अनेक एसटी कर्मचारी आंदोलनाला भेट दिली व परिवहन मंत्री अनिल परब यांना भेटलो त्याप्रमाणे प्रा. कवाडे सर काटोल एसटी कर्मचारी बेमुदत संपाला समर्थन देण्याकरता आंदोलनस्थळी आले असताना त्याचे समर्थन जाहीर केले व संपकरी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांचे आभार मानले.
या वेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र डोंगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महासचिव युवराज मेश्राम, पिपळाचे जिल्हा महासचिव अरुण वाहने, पिरिपाचे जिल्हा उपाध्यक्ष व नरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे डायरेक्टर संजय बडोदेकर, नागपूर प्रदेशचे अध्यक्ष गोपीचंद ढोके, कळमेश्वर तालुक्याचे अध्यक्ष दादारावजी शिरसाट, काटोल तालुक्याचे नेते संजयजी गायकवाड, उमेश शेंडे, कोकाटे, ताज मोहम्मद शेख आणि मोठ्या प्रमाणात अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.