वीर बिरसा मुंडा जयंती पर्वावर धम्मक्रांती दिन साजरा.

61

वीर बिरसा मुंडा जयंती पर्वावर धम्मक्रांती दिन साजरा.

वीर बिरसा मुंडा जयंती पर्वावर धम्मक्रांती दिन साजरा.
वीर बिरसा मुंडा जयंती पर्वावर धम्मक्रांती दिन साजरा.

युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲 9766445348 📲
काटोल:- वरून 15 किलोमीटर अंतराव चणकापूर येथे वीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने धम्मक्रांती दिन साजरा करण्यात आला. भारतीय बौद्ध जन परिषद शाखा (माळेगाव) चेनकापूर यांच्या वतीने हा कार्यक्रम चणकापूर (माळेगाव ) येथे घेण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घघाटक लाँग मार्चचे प्रणेते, माजी खासदार, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष नरेंद्रजी डोंगरे तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीच्या उपसभापती अनुराधाताई खराडे, पंचायत समिती सदस्य चंदाताई देव्हारे, पंचायत समिती सदस्य संजय डांगोरे, पंचायत समिती सदस्य निशिका नागमोते, कल्पनाताई उमप, जयाताई वानखेडे सरपंच माळेगाव, कैलास कुर्वेकर सरपंच झिल्पा, दिगंबरजी लोखंडे उपसरपंच माळेगाव, शिवाजी देव्हारे उपसरपंच झिल्पा, कृषी उत्पन्न बाजार समिती नरखेडचे संचालक संजय बडोदेकर, पीपल्स रिपब्लिकन पार्टी नागपूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष संजय खांडेकर, आदिवासी समाजाचे नेते रमेशभाऊ वाडीवा, सामाजिक कार्यकर्ते गौरव उईके, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुका अध्यक्ष दादारावजी शिरसाट, ब्राह्मणी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य ताज मोहम्मद शेख, नागपूर प्रदेशाध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते गोपीचंद ढोके, पीपल्स रिपब्लिकन ब्रिगेडच्या नेत्या भागाबाई नारनवरे, सामाजिक कार्यकर्त्या मायाताई खोबरागडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महासचिव युवराज मेश्राम हे उपस्थीत होते.

कार्यक्रमाच्या पूर्वी भगवान गौतम बुद्ध, बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांना पाहुण्या तर्फे पुष्पमाला अर्पण करण्यात आली. प्रा. जोगेंद्र कवाडे सरांनी उपस्थितांना बिरसा मुंडा व धम्मक्रांती यावर मार्गदर्शन केले. या देशातील दलित, आदिवासी, ओबीसी हे सर्व आपण एक विचाराचे असून आपण सर्व गुण्यागोविंदाने रहावे व थोर पुरुषांचे विचार आपण अंगीकारावे. बिरसा मुंडा हे स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांसोबत लढले अशा वीर स्वातंत्र्यसंग्राम सैनिकाचा पुतळा या गावी झाला पाहिजे आणि या करता आम्ही सुद्धा आपणास मदत करू अशा पद्धतीचे विचार प्राध्यापक कवाडे सर यांनी मांडले. दरवर्षाला स्वातंत्र्य संग्राम सैनिक बिरसा मुंडा यांची जयंती या गावात झाली पाहिजे. प्रत्येक गावात दरवर्षी ही जयंती साजरी झाली पाहिजे असे विचार माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे सरांनी मांडले.

यावेळी प्रमुख उपस्थिती संजय गायकवाड पीपल्स रिपब्लिकन पार्टी काटोल तालुक्याचे नेते, कोकाटे, नंदकिशोर पाटील पीपल्स रिपब्लिकन पार्टी कळमेश्वर तालुक्याचे नेते, बंडू डोंगरे, रामदास बऊतमांगे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण वासुदेव बोरघाटे यांनी केले. अनुराधाताई खराडे पंचायत समिती उपसभापती, त्याच प्रमाणे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष नरेंद्रजी डोंगरे कार्यक्रमाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे उद्घघाटक माजी खासदार जोगेंद्र कवाडे सर यांचे भाषणे झालीत. आभार प्रदर्शन अर्जुनजी शिंदे यांनी केले. तर या कार्यक्रमाला संगीताताई बोरघाटे, निखिल कासूरके, सागर कासूरके, हरिदास सोमकुवर, उर्मिला सोमकुवर, पवन बोरघाटे, अशोक शेळके उईके सुनंदा बोरघाटे, विकास वाहने, शाहीर अशोक वाहने, भारत कोडापे , दिलीप ठाकरे गोविंदा चंद्रिकापुरे , मंगेश कासूरके, रमेश मसाने, गौरव उईके यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे संचालन भारतीय बौद्ध महासभा तालुका कळमेश्वरचे अध्यक्ष अरुणभाऊ वाहणे यांनी केले. तर आभार प्रदर्शन अर्जुन शेंडे यांनी केले.

यानंतर कव्वाल भिमेश भारती व लता किरण यांचा दुय्यम कव्वालीचा प्रबोधनात्मक
कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.