एनआरएचएम कर्मचार्‍यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नरत – आ. जोरगेवार

52
एनआरएचएम कर्मचार्‍यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नरत - आ. जोरगेवार

एनआरएचएम कर्मचार्‍यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नरत – आ. जोरगेवार

एनआरएचएम कर्मचार्‍यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नरत - आ. जोरगेवार

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा

चंद्रपूर, 16 नोव्हेंबर
विविध मागण्यांना घेऊन एन. आर. एच. एम. कर्मचार्‍यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समीतीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन सुरु केले आहे. गुरूवारी आ. किशोर जोरगेवार यांनी आंदोलन स्थळी भेट देत आपल्या मागण्या रास्त असून, त्या सोडविण्यासाठी पुर्ण शक्तीनिशी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी एन.आर. एच. एम. च्या महिला कर्मचार्‍यांनी भाऊबीज करत आ. जोरगेवार यांचे औक्षवंत केले. कर्मचार्‍यांच्या मागण्यांसदर्भात मु‘यमंत्री, उपमु‘यमंत्री, राज्याचे मु‘य सचिव यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मार्गी लागाव्यात, यासाठी एक बैठक आयोजित करण्याच्या दिशेने प्रयत्न करेल, हीच भाऊ म्हणून ओवळणी राहील, असेही ते म्हणाले.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी रविंद्र उमाटे, डॉ. तिरथ उराडे, अतुल शेंद्रे, डॉ. अक्षय बुर्लावार, डॉ. दीपक भट्टाचार्य, वनिता मेश्राम, डॉ. विनोद फुलझेले, ललिता मुत्तेलवार, डॉ. तुषार आगडे, जया मेंदळकर, अश्विनी येंबरवार, प्रफुल रासपल्ले, रुपेश हिरमठ आदींची उपस्थिती होती.
नियमित रिक्त पदावर समायोजन करावे, विशेष भरती मोहिम दर सहा महिन्यांनी राबवावी, एम एच एम अतंर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना ईपीएफ योजनेचा लाभ द्यावा यासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे आंदोलन सुरू आहे.
आपल्या मागण्या रास्त असून, अधिवेशनात हा मुद्दा मांडणार आहे. पण, तत्पूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेवून आपल्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. महिलांनी भाऊबीज साजरी करत मला औक्षवंत केले. त्यामुळे भाऊ म्हणून माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. माझ्या बहिणींना रस्त्यावर दिवाळी साजरी करावी लागत असेल, हे दुर्भाग्य आहे. मात्र, आपण चिंता करु नका. हा भाऊ प्रत्येक कठीण प्रसंगी आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.