कोलाड नजीक वरसगाव येथे चहा टपरीत इसमाची कर्जापोटी गळ फास घेऊन आत्महत्या

108
कोलाड नजीक वरसगाव येथे चहा टपरीत इसमाची कर्जापोटी गळ फास घेऊन आत्महत्या

कोलाड नजीक वरसगाव येथे चहा टपरीत इसमाची कर्जापोटी गळ फास घेऊन आत्महत्या

कोलाड नजीक वरसगाव येथे चहा टपरीत इसमाची कर्जापोटी गळ फास घेऊन आत्महत्या

✍️तेजपाल जैन ✍️
कोलाड प्रतिनिधी
📞8928847695📞

कोलाड :- कोलाड शनिवार १६ नोव्हेबर रोजी स.७.४५ वा.मौजे वरसगांव येथे चहा टपरीच्या मागे सामान ठेवण्याच्या खोलीमध्ये एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तर घडलेल्या घटनेमुळे वरसगाव सह कोलाड आंबेवाडी नाक्यावर सकाळी एकच खळबळ उडाली.

रोहा तालुक्यातील वरसगाव भिरा फाट्यावर चहाचा व्यवसाय तसेच टपरी चालक सहदेव कांदलगावकर हे व्यवसाय यांनी आपल्यावर भयाण झालेल्या कर्जापोटी गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.तर घडलेल्या घटनेमुळे सदरच्या परीसरात एकच खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिस यंत्रणा घटनास्थळी पोहोचले आणि घटनेची माहिती घेत तपास सुरू केला आहे.

तर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार वरील तारखेस व वरील वेळेस सहदेव प्रभाकर कांदळगावकर वय वर्षे ५४ वर्षे या मयत झालेल्या इसम यांनी चहाची टपरी चालविण्याकरिता कर्ज घेतला तो फेडू न शकल्यामुळे मयत यांनी नायलॉनच्या दोरीने गळफास घेतले होते.उपचारासाठी त्याला रोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले असता त्याला डॉक्टरांनी मृत्यु घोषित केले.

कोलाड पोलिस ठाण्यात मृत्यू रजिस्टर नं. १५/२०२४BNSS १९४प्रमाणे नोंद झाली असुन याविषयी कोलाड सपोनि नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार एन. एन चौधरी तसेच पोहवा एम डी पाटील अधिक तपास करीत आहेत.