Home latest News जटपूरा पंचतेली समाज कमिटीच्या अध्यक्षपदी राजेश बेले बिनविरोध
देवस्थानच्या विकासाला प्राधान्य देत समाजोपयोगी उपक्रमांना गती देणार – राजेश बेले
चंद्रपूर, 16 नोव्हेंबर : श्री. हनुमान देवस्थान व्यवस्थापक जटपूरा पंचतेली समाज कमिटीच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आमसभा निवडणुकीमध्ये, राजेश बेले यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. समाजाच्या एकजुटीचे आणि विश्वासाचे प्रतीक म्हणून त्यांची ही निवड अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे.
समस्यांचे निराकरण करण्यासाठी अनुभवी सदस्यांची निवड करण्यात आली आहे
बहुमताने उपाध्यक्ष दिनेश जुमडे, सचिव शैलेश जुमडे सहसचिव रवी लोणकर कोषाध्यक्ष रवींद्र जुमडे सदस्य किशोर शेंडे यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यकारिणी सदस्य म्हणून किशोर शेंडे, देवेंद्र बेले, प्रमोद हजारे, बाळकृष्ण वैरागडे, विजय इटणकर, राजेंद्र रघाताटे तर सल्लागार कमिटीत रतन हजारे, प्रभाकर जुमडे, अरुण वैरागडे, नानाजी बानकर, संजय बेले आदी ज्येष्ठांचा समावेश करण्यात आला आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश बेले यांनी आपल्या निवडीबद्दल समाजाचे आभार मानले आणि देवस्थानच्या विकासासाठी, तसेच समाजोपयोगी उपक्रमांना गती देण्यासाठी सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम करण्याची ग्वाही दिली.
ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. नवीन कार्यकारिणी समाजाला एक नवी दिशा देईल आणि देवस्थानचे व्यवस्थापन अधिक सुव्यवस्थित करेल, असा विश्वास यावेळी उपस्थित असलेल्या सर्व पंचतेली समाज बांधवांनी व्यक्त केला.