कळमेश्वर येथे 200 शिवसैनिकांनी केले रक्तदान
युवराज मेश्राम प्रतिनिधी
कळमेश्वर:- शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजू हरणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कळमेश्वर शिवसेनेच्या वतीने आज मंगळवारला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. यात 200 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाप्रती व शिवसैनिकांना दिलेल्या आदेशानुसार स्थानिय शिवसैनीकांनी आज मंगळवार ता.15 रोजी कळमेश्वर येथील खुले नाट्य मंदिर येथे सकाळी 9 ते सायं.4 पर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे मुख्य आयोजक युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रशांत ईखार यांच्याकडून रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून खा.कृपाल तुमाने होते.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रामटेक लोकसभेचे संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी होते. तसेच कार्यक्रमाला सेनेचे ईतर पदाधीकारी,मान्यवर व शिवसैनीक प्रामुख्याने उपस्थीत होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता, राहुल चूनारकर, सचिन रघुवंशी, विजय वाघधरे, किशोर तुरकर, निखिल लामसे, अविनाश पाटील, आकाश पिंपळकर, अक्षय माकोडे, राजू धार्मिक, सुनील कावडकर, गायत्री अढाऊ, जयश्री अकोटकर, लोकेश धोटे, विलास बारमासे, सुभाष डोमके, राजु बोरकर, प्रदिप कट्यारमल, भूषण कौरती अादिं शिवसैनिकांनी अथक परीश्रम घेतले.