कळमेश्वर तालुक्यात अवैध रेती वाहतुकीचा सुसुळाट.

जड वाहने तात्काळ बंद करन्याची भीम आर्मीची तहसीलदारांना निवेदनातून मागणी.

युवराज मेश्राम तालुका प्रतीनीधी

कळमेश्वर:-  तालुक्यात अवैध रेती वाहतुकीला प्रचंड ऊत आला असून स्थानिय प्रशासनाच्या उदासीनतेमुळे छूप्या मार्गांवरुन रेतीची सर्रास वाहतूक होत आहे. तालुक्यातील मोहपा ते कोहळी रोडवर छूप्या मार्गाने अवैधरित्या रेती भरलेले ट्रक डोझर भरधाव वेगाने वाहने चोवीस तास चालत असतात.हि अवैध वाहतुक नागरिकांच्या जीवीतहानीला कारणीमांश ठरु शकते, त्यामुळे हि अवैध वाहतुक तात्काळ बंद करावी याबाबतचे निवेदन तहसीलदार कळमेश्वर यांना भीम आर्मीच्या वतीने नुकतेच देण्यात आले.


कळमेश्वर तालुक्यातील मोहपा ते कोहली गावातील अंतर्गत रस्त्यावर अवैध् रेती ट्रक व इतरत्र जड वाहणे चोवीस तास सुरू असतात. अवैध रेती ट्रक व डोझर गावाच्या चोर रस्त्यांचा वापर करून सरकारचा महसूल व रस्त्यांची क्षमता नसतानाही सुरु असते.हा सर्व भोंगळ कारभार प्रशासनाच्या नाकावर टिचून गैर जबाबदारीने सुरु आहे. संपूर्ण विदर्भात रेती घाट बंद असताना आपल्या नागपूर जिल्हयात अवैध् रेती कुठून येत आहे असा आरोप आहे. या रस्त्यांवर नागरिकांची मोठ्या प्रमानात वर्दळ असल्याने नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन रहदारी करावी लागत अाहे. या अवैध वाहतुकीवर तात्काळ अाळा घालावा व अवैध रेती वाहतूक वाहने बंद करावी. अन्यथा भीम आर्मीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येनार असा इशारा भीम आर्मीचे जिल्हाअध्यक्ष प्रफुल शेंडे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here