चुनाळा स्मशानभूमी विकास व सौंदर्यीकरणासाठी निधीची मागणी ग्रामपंचायत सदस्य रवी गायकवाड यांची मागणी

53

चुनाळा स्मशानभूमी विकास व सौंदर्यीकरणासाठी निधीची मागणी

ग्रामपंचायत सदस्य रवी गायकवाड यांची मागणी

चुनाळा स्मशानभूमी विकास व सौंदर्यीकरणासाठी निधीची मागणी ग्रामपंचायत सदस्य रवी गायकवाड यांची मागणी
चुनाळा स्मशानभूमी विकास व सौंदर्यीकरणासाठी निधीची मागणी
ग्रामपंचायत सदस्य रवी गायकवाड यांची मागणी

खुशाल सूर्यवंशी
राजुरा शहर ग्रामीण
प्रतीनीधी
8378848427

राजुरा, दि. 15 डिसेंबर : तालुक्यातील चुनाळा येथील वाढती लोकसंख्या व गावाचा वाढत विस्तार बघता जनसुविधा विशेष अनुदान योजनेंतर्गत गावातील स्मशानभूमी विकास व सौंदर्यीकरण कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य रवी गायकवाड यांनी जिल्हा परिषद सभापती सुनिल उरकुडे यांच्याकडे केली.
याबाबतचे निवेदन कृषी व पशू संवर्धन सभापती सुनील उरकुडे यांच्या कडे देण्यात आले. यावेळी सभापती उरकुडे यांनी स्मशानभूमी विकास व सौंदर्यीकरण कामांसाठी जनसुविधा विशेष अनुदान योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वस्त केले. लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाणार असून चुनाळा गावाच्या विकासासाठी पुन्हा प्रयत्न करणार असल्याचे उरकुडे यांनी सांगितले. रवी गायकवाड यांच्याकडून गावाच्या विकासासाठी शासन स्तरावर निधीची मागणी करण्यात येत असून लवकरच विविध योजनेतून गावाच्या विकासाला निधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.