आदिवासी एकता परिषदेचे यावल तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन सुरू

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 7666739067
*दि.15-12-2021रोजी तहसील कार्यालय यावल येथील कार्यालयासमोर आदिवासी एकता परिषदेने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे आदिवासी एकता परिषद भारत संघटनेच्या वतीने अनेक वेळा निवेदन देवून देखील मागण्यांसंदर्भात कुठलीच कारवाई होत नसल्याने बुधवारपासून त्यांनी आंदोलन सुरू केलेमार्फत धरणे आंदोलन घेण्यात आले.*
*1)शासण निर्णय प्रमाणे भुमिहीन आदिवासींना सबलीकरण योजना मार्फत ५ एकर जमीन मिळावी.*
*२) प्रत्येक गावात आदिवासी समासाठी संस्कृती प्रथा परंपरा प्रमाणे दफनविधीसाठी दफनभूमीसाठी एक एकर जमीन मिळावी.*
*३) प्रत्येक गावागावात आदिवासींचे अतीक्रमीत जागेवर राहतात त्या जागा नावे लावून देणे बाबत.*
*४) आदिवासींचे जात प्रमाणपत्र १९४९चा पुरावा नसल्यास स्थानिक चौकशी करून कमीतकमी कागदपत्र घेऊन आदिवासींना जात प्रमाणपत्र देण्यात यावे.*
*५) आदिवासींना शासन निर्णय प्रमाणे कमीतकमी कागदपत्र घेऊन शिधापत्रिका (रेशनकार्ड)वाटप करणे बाबत…*
*६) आदिवासी मुलांचे नाव शाळेत दाखल करते वेळी धर्माच्या कॉलममधे हिंदू भिल्ल हिंदू पावरा हिंदू पारधी मुस्लिम तडवी भिल्ल ख्रिश्चन भिल्ल अस्या प्रकारे नाव न नोंदणी करता आदिवासी भिल्ल आदिवासी पावरा आदिवासी तडवी भिल्ल आदिवासी पारधी अस्या प्रकारे नाव नोंदणी करावी…*
*इत्यादी विषयांवर धरणे आंदोलन करण्यात आले व उपस्थित पदाधिकारी आदि.ए.परिषद महा.राज्य संपर्क प्रमुख आप.सुनिल भाऊ गायकवाड जिल्हा अध्यक्ष आप.करण भाऊ सोनवणे जि.सचिव आप.यशवंत भाऊ अहिरे जि.संपर्क प्रमुख आप.सुधाकर सोनवणे जि.सदस्य आप.बी.आर.दादा तडवी यावल तालुका अध्यक्ष आप.भुरा भाऊ भिल जामनेर तालुका अध्यक्ष आप.लहू लक्षदादा मोरे आप.सदु दादा भिल व आदी समाज बांधव उपस्थित होते…*