मुरमाडी तूप. येथील शासकीय आधार भूत धान्य खरेदी केंद्र बंद.छ. संभाजी शेतकरी सेवा संघटना आक्रमक पवित्रा

56

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
7620512045

लाखणी:-तालुक्यातील मुरमाडी/तुप येथील दी. भगीरथ सहकारी भात गिरणी धान मोजणी दि. २०/११/२०२१ पासून सुरू झाली परंतु शाशन अटीनुसार ११ हजार कट्टे मोजणी झाली. मात्र २४ हजार क्षमतेची मोजणी साठी जागा उपलब्ध असूनही ४/१२/२०२१ पासून शेतकऱ्याची धान मोजणी केंद्रावर बंद झालेली आहे. २०१९ शेतकऱ्यांची ऑन लाईन केलेली असून आतापर्यंत फक्त १८९ शेतकऱ्यांची धान मोजणी झालेली आहे. तेव्हा अजूनही १८२० शेतकऱ्यांची धान मोजणी झालेली नाही, शेतकरी आल्या पावली वापस जात आहे, शासनाच्या विविध जाचक अटीमुळे व लोकपरतिनिधीं च्या उदासीन धोरणामुळे नाहक समस्या शेतरीवर्गामधून होत आहे. तेव्हा आज १३ दिवस होवुन सुध्दा धान मोजणी सुरू झालेली नाही आहे, दि. भगीरथ सहकारी संस्था चे वतीने भंडारा जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी, जिल्हाधिकारी, तालुका अधिकारी यांना सुध्दा निवेदनाच्या मध्येमातून कळविले परंतु आजपर्यंत कोणतीही केंद्र सुरू करण्याची प्रकिया देण्यात आलेली नाही. ११ हजार कट्टे मोजणी करून गोडवून फुल्ल झाले असे गृहीत धरून शेतकऱ्यांना वेठीस धरून धान मोजणी साठी जागा उपलब्ध नसल्याचे कारण सांगत आहेत. तरीपण अजूनही धानाची उचल केली नाही तेव्हा छ. संभाजी शेतकरी सेवा संघटने चे पदाधिकारी तेथे येवुन समस्या मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. ही समस्या पाच दिवसांच्या आत धान मोजणी सुरु न केल्यास एक जोरदार जन आंदोलन शेतकरी व छ. संभाजी शेतकरी सेवा संघटने तर्फे करण्यात येणार असा ई सारा देण्यात येत आहे.