बहुउद्देशीय मंडळ बल्लारपूर च्या वतीने संलग्नित ज्युनियर कबड्डी निवड चाचणी व प्रतियोगीता स्पर्धा सम्पन्न

57

बहुउद्देशीय मंडळ बल्लारपूर च्या वतीने संलग्नित ज्युनियर कबड्डी निवड चाचणी व प्रतियोगीता स्पर्धा सम्पन्न

बहुउद्देशीय मंडळ बल्लारपूर च्या वतीने संलग्नित ज्युनियर कबड्डी निवड चाचणी व प्रतियोगीता स्पर्धा सम्पन्न
बहुउद्देशीय मंडळ बल्लारपूर च्या वतीने संलग्नित ज्युनियर कबड्डी निवड चाचणी व प्रतियोगीता स्पर्धा सम्पन्न

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर

बल्लारपूर : -श्री तरुण उत्साही क्रिडा व बहुउद्देशिय मंडळ बल्लारपूर यांच्या वतीने हौशी जिल्हा कबड्डी असोसिएशन चंद्रपूर* सलग्नित *ज्युनियर कबड्डी निवड चाचणी व प्रतियोगिता स्पर्धा दि.१३ व १४ डिसेंबर २०२१ शिवाजी वॉर्ड बल्लारपूर येथे आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या समारोपीय व बक्षीस वितरण समारंभास मा. श्री चंदन सिंह चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांची अध्यक्षीय उपस्थिती लाभली.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री दिलीप रामिडवार सचिव हौशी जिल्हा कबड्डी असोसिएशन चंद्रपूर, मा.श्री शेख जुम्मन रिझवी भाजपा अल्पसंख्यक आघाडी जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, भाजपा शहर अध्यक्ष मा.श्री काशीनाथ सिंह, सर्व मा. नगरसेविका- सौ सुवर्णा भटारकर, सौ.जयश्री मोहूर्ले, श्री राम सेना महासंघ बल्लारपूर अध्यक्ष श्री बीरेंद्र श्रीवास,बल्लारपूर तालुका क्रिडा संयोजक श्री किशोर मोहूर्ले,माजी नगरसेवक श्री विकास दूपारे,भाजपा जिल्हा सोशल मीडिया सहसंयोजक श्री आशिष चावडा,भाजपा युवा नेतृत्व श्री विशांकसिंह ठाकुर,भाजपा नेता श्रीअरूण भटारकर, भाजपा महिला नेतृत्व बोम्मावार ताई उपस्थित होते.या प्रसंगी मार्गदर्शन करताना आदरणीय बाबुजी यांनी खेळ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.या ज्युनियर वयात मुलं खेळात सहभागी होऊन भविष्याची पायरी तैय्यार होण्यास मदतगार ठरते.सोबतच शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम होतात.आजच्या या अत्याधुनिक जगात अनेक नवीन प्रकारचे खेळ आले आहेत तरीही आपण आपले पारंपारिक खेळ जे संपूर्ण जगात नावलौकिक आहेत अश्या कबड्डीला प्रत्येक स्तरावर व्यायाम शाळा किंवा अन्य मंडळाच्या माध्यमातून आयोजित करून अनेक खेळाडूंना एक मंच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो असे मत यावेळी बाबुजी यांनी व्यक्त केले.
ज्युनियर पुरुष गटात एकूण ३६ टीम ने भाग घेतला होता. यात श्री विठ्ठल व्यायाम शाळा चंद्रपूर हा विजेता संघ ठरला व श्री गुरुदेव क्रिडा मंडळ गोवरी उपविजेता संघ ठरला.ज्युनियर महिला गटात जय हिंद क्रिडा मंडळ नागरी विजेता संघ ठरला व आदर्श क्रिडा मंडळ चंद्रपूर उपविजेता संघ ठरला.या संघांना आदरणीय चंदन सिंह चंदेल जी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी 🏆 व रोख बक्षीस देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सोबतच यावेळी बाबुजी व मान्यवरांनी श्री तरुण उत्साही क्रिडा मंडळ बल्लारपूर यांचा देखील कौतुक करून भविष्यात आपण असेच उपक्रम व क्रिडा उत्सव चालु ठेवण्याकरिता शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे संचालन भाजपा शहर सचिव, बेरोजगार अभियंता असोसिएशन चंद्रपूर चे अध्यक्ष इंजि.देवेंद्र वाटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री किशोर मोहूर्ले यांनी केले.कार्यक्रमाच्या नियोजन व यशस्वी करण्याकरिता श्री तरुण उत्साही क्रिडा मंडळ बल्लारपूर चे अध्यक्ष श्री प्रदीप कोकोडे, साई मित्र परिवार चे अध्यक्ष श्री राहुल कोत्तावार, कार्तिक रामटेके, उपाध्यक्ष श्री वेणू एंनगंदलावार,नियोजन समितीचे अध्यक्ष भास्कर मुळे, उपाध्यक्ष नयन बोम्मावार,सचिव आशिष नन्नावरे, कोषाध्यक्ष अश्विन वरखडे मंडळाचे सदस्य प्रिझम वाढई,विश्वास कंनाके,nayan प्रथम मोहुरले, रेवन शास्त्रकार,भूषण पस्पुलकर, प्रथमेश भटारकर,आकाश सातपुते, साहिल दासरवार, संदीप चौधरी पारस लेनगुरे यांनी मेहनत घेतली.