कलार समाजातील बांधवांनी एकत्र येणे काळाची गरज

सौ. संगीता संतोष ठलाल

मु. कुरखेडा जि. गडचिरोली

मो:७८२१८१६४८५

गेल्या चार दिवसांपासून बरेच समूहांमध्ये कलार समाजाचा मोर्चा या विषयी मी वाचत आली आहे,ऐकत आलेली आहे मला खूप आनंद झाला आपल्या समाजाच्या हितासाठी महाराष्ट्र शासनाला निवेदन देण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला आहे व पुढे होऊन जे मोलाचे योगदान देत आहेत त्या बद्दल कलार समाजातील सर्व कार्यकर्ते बांधवांना खूप, खूप मनःपूर्वक शुभेच्छा या भल्या मोठ्या जगामध्ये असे बरेच समाज आहेत त्यामध्ये एक आमचा कलार समाज सुध्दा आहे. पण, पाहिजे तेवढ्या प्रमाणात कलार समाजाची जगामध्ये अजूनही ओळख झालेली नाही व कोणाला कलार समाज कोणता आहे हे सुध्दा माहीत नाही. या विषयी कुठेतरी दुःख वाटते कारण,एवढा मोठा कलार समाज असून सुध्दा कलार समाजातील बंधू, भगिनी एकत्र येण्यासाठी थोडाही वेळ काढत नाही त्यामुळे समाजाची कुठेतरी जगात ओळख होत नाही. थोडक्यात का होईना या विषयी मी आज व्यक्त होत आहे.

गेल्या पाच वर्षांआधी एका कार्यक्रमात मला प्रमुख पाहुणी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी माझे भाषण झाल्यानंतर एका व्यक्तीने मला प्रश्न केला की, संगीता ताई आपण कोणत्या समाजातील आहात…?मी म्हटली मी कोसरे कलार समाजातील आहे. पुन्हा त्यांनी प्रश्न विचारला की,ताई आजपर्यंत कोसरे कलार हा समाज मला माहीत नाही. व आपल्या समाजाच्या विषयी एकही बातमी मी वाचली नाही. कोणते कार्यक्रम वैगेरे होतात की नाही तेही आजपर्यंत बघण्यात आले नाही. त्यावेळी हे सर्व ऐकून मी गप्प राहिली. क्षणभरासाठी मलाही हे योग्य वाटले नाही. कारण,ती व्यक्ती जे काही मला प्रश्न विचारत होती त्याचा दोष नाही.

     कुठेतरी ही शोकांतिका आहे. आणि हीच शोकांतिका दूर करण्यासाठी हीच ती योग्य वेळ व संधी आहे कलार समाज बांधवांनी एकत्र येण्याची.सोबत जास्तीत, जास्त तरूणांनी ह्या मोर्च्यात सहभागी होऊन प्राधान्य देण्याची आज जर आपल्याच समाजासाठी एकत्र आले नाही तर..एक दिवस या जगामध्ये आमच्या कलार समाजाची ओळख होणार नाही. त्यावेळी आपण कोणाला दोष देत फिरणार…? आपल्या समाजासाठी दुसरा कोणी वाली धावून येईल ही अपेक्षाही ठेवू नये कारण, हा घोर कलियुग आहे ईथे कोणताही वाली उरला नाही. आपणच आपल्या समाजासाठी व आपल्या येणाऱ्या भावी पिढीसाठी

जगामध्ये आपल्या कलार समाजाची ओळख निर्माण करण्यासाठी त्याला ताकदवान बणविण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्र येणे गरजेचे आहे. एक प्रचलित म्हण आहे ती म्हणजेच की “काम सोडून गेला नाही आणि कर्ज सोडून मेला नाही” विचार करा दररोज आपण दैनंदिन काम करत असता. आपला व्यवसाय,शेती,दुकान, नौकरी, वैगेरे प्रामाणिकपणे करत असता. ही चांगली गोष्ट आहे, पण,आज जर.. आपण कितीही कमावले तरी ते जन्मभर पुरत नाही,ते टिकूनही राहत नाही कारण कोणतीही गोष्ट ती कायम पर्यंत टिकून राहत नाही पण, आज जर…आपल्या कलार समाजासाठी व उद्या येणाऱ्या आपल्या समाजातील भावी पिढीसाठी एकत्र आले तर..मात्र त्यांना कोणासमोर झुकावे लागणार नाही. इथे सर्वांना स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे ,आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी , विकासासाठी, एका दिवसांसाठी तरी आपल्या कलार समाजाच्या हितासाठी विचार करावे, थोडा वेळ काढावे एक दिवस ह्या, सर्वं गोष्टींना बाजूला ठेवून. हक्काने पुढे चला आवाज उठवा. मोठ्या आनंदाने आपण म्हणत असता ना की,आम्ही कलार आहोत हीच एकता ठेवून कोणतेही कारणे,किंतू, परंतु न सांगता फक्त एक दिवस बहुसंख्येने या मोर्च्यात सहभागी व्हावे खास करून कलार समाजातील युवकांनी,युवतींनी पुढाकार घ्यायला पाहिजे.

लेखिका: सौ. संगीता संतोष ठलाल

आज आपल्या कलार समाजामध्ये बरेच असे युवक उच्च शिक्षण घेऊन बेरोजगार आहेत. मग कुठपर्यंत ही बेरोजगारी आपण सहन करायची..? एवढी महागाई वाढलेली आहे. त्याच प्रमाणे कलार समाजातील काही मुलांना,मुलींना शिक्षणाची खूप आवड असून सुद्धा ते पुढचे शिक्षण घेऊ शकत नाही , योग्य ती शिक्षण घेण्यासाठी राहण्याची सोय नाही आणि शिक्षण घेऊन सुध्दा पाहिजे त्या प्रमाणात नौकरी मिळत नाही एवढेच नाही तर आपल्या कलार समाजामध्ये असे अनेक कितीतरी कलागुणांना भरलेले कलावंत आहेत त्यांचीही जगात ओळख होत नाही.त्यात काही गरीब कुटूंब सुध्दा आहेत मग कोठपर्यंत आपण गप्प बसायचे..? आपल्या कलार समाजाला उचित स्थान मिळण्यासाठी व भविष्यात मानसन्मान मिळण्यासाठी आजच सर्वांनी मिळून पुढे आले पाहिजे.

आपण विचार करून बघा आपला एवढा मोठा कलार समाज असून सुध्दा समाजासाठी साधं सभागृह उपलब्ध नाही. एखादा कुठे कार्यक्रम घ्यायचे म्हटले तर.. दुसऱ्यांना जागा मागावे लागते. हे, कुठपर्यंत…? त्यांनी जर…जागा देण्यास नकार दिले तर..? मग दुसरा पर्याय नाही. म्हणूनच पुन्हा अशी आपल्या कलार समाजावर वेळ येऊ नये यासाठी जागे होणे काळाची गरज आहे. मागे काही वर्षा आधी जे काही झाले, गेले ते विसरून जा , मतभेद विसरून जा, मी आणि माझा कलार समाज हीच भावना आपल्या मनात ठेवून आपुलकीने येत्या बावीस तारखेला महाराष्ट्र शासनाला निवेदन देण्यासाठी विधान भवन नागपूर च्या समोर आपल्या व आपल्या समाजासाठी एकत्र या म्हणतात ना की, अनेकतामध्ये एकता असते

      हीच एकता आपल्याला दाखवून द्यायची आहे.आज आपण आपल्या कलार समाजाच्या बाबतीत चिंता केलोय तर.. पुढे शासन आपल्याला मदत करेल पण,आपणच जर आज जागले नाही,आवाज उठवले नाही किंवा वेळ काढून मोर्च्यात सहभागी झाले नाही तर…पुढचे येणारे प्रत्येक दिवस , अनेक वर्षे खूप कठीण प्रसंगातून जावे लागतील. तेव्हा आपण कोणाला हाक मारणार…? ती हाक ऐकून घेणारा कोणी शोधूनही सापडणार नाही म्हणूनच आज आपण जागे होणे काळाची गरज आहे. आपल्या समाजाची ओळख निर्माण करायची आहे. आणि ही जबाबदारी आम्हां सर्व कलार बंधू,भगिनींची आहे त्यासाठी मोर्च्यामध्ये बहुसंख्येने उपस्थित राहून. आपल्या कलार समाजाच्या हितासाठी एकत्र येणे काळाची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here