भंडारा शहरात घटस्फोटाचे प्रकरण लढत असलेल्या महिला वकिलावर बहिण जावयाने केला चाकूने हल्ला

55

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा 📱मो.नं.9373472847📞

भंडारा : दिनांक १६ डिसेंबर २०२३ रोजी भंडारा शहरात धाकट्या बहिणीच्या घटस्फोटाचे प्रकरण लढत असलेल्या महिला वकीलावर तिच्या बहीण जावयाने चाकूने हल्ला केल्याने गंभीर जखमी केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी दुपारी ११:३० वाजताच्या सुमारास भंडारा शहरातील माकडे नगर मोहल्ल्यात घडली. सरिता माकडे, असे जखमी महिला वकिलाचे नाव आहे. महेश डोकरीमारे वय (४२ ) वर्षे, रा. पांडे महाल जवळ, भंडारा), असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे.
सरिता माकडे या व्यवसायाने वकील असून त्या जिल्हा सत्र न्यायालयात कार्यरत आहेत. सरिता यांच्या बहिणीचे लग्न सन २०१४ साली हिदू रिती रिवाज्याप्रमाणे झाले. मात्र काही काळानंतर पती-पत्नीमध्ये छोट्या छोट्या सुल्लक कारणावरून खटके उडायला सुरवात झाली. हळूहळू दोघांमधील कौटुंबिक वाद टोकाला जाऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत आले.
सरिता यांनी त्यांच्या बहिणीच्या बाजूने वकीलपत्र घेतले. आणि केस लढायला सुरवात केली. शनिवारी, सकाळी त्याचाच राग मनात धरून त्या न्यायालयात जात असताना त्यांच्या बहिजावयाने त्यांना वाटेत रोखले. त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यात त्या गंभीर जखमी झाल्या. या प्रकरणी भंडारा पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी महेश डोकरीमारे यांच्याविरुध्द भादंवि ३२६, ३२३, ५०४, ५१० कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सहायक फौजदार गजानन वलथरे करीत आहे.