पीएनपी संकुलात रंगणार प्रभाविष्कार

37
पीएनपी संकुलात रंगणार प्रभाविष्कार

पीएनपी संकुलात रंगणार प्रभाविष्कार

पीएनपी संकुलात रंगणार प्रभाविष्कार

१८ ते २१ डिसेंबरला होणार विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम

मंगळवार १७ डिसेंबरला क्रिडा रॅलीचे आयोजन

रत्नाकर पाटील रायगड ब्यूरो चीफ ९४२०३२५९९३

अलिबाग: अलिबाग तालुक्यातील वेश्‍वी येथील पीएनपी शैक्षणिक संकुलाद्वारे ‘प्रभाविष्कार’ या सांस्कृतिक सोहळ्याचे १८ ते २१ डिसेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा ठाव घेऊन त्यांच्या अंतर्मनाचा वेध घेणारा व त्याचबरोबर सर्वांगीण विकासाला वाव देणार्‍या कार्यक्रमाचे सादरीकरण या सोहळ्यात होणार आहे.

पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या वेश्‍वी येथील क्रीडा संकुलात मंगळवार ( दि.१७ ) डिसेंबरला क्रीडा ज्योत प्रज्वलित करून रॅलीला सुरुवात केली जाणार आहे. संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत.

बुधवार ( दि. १८ ) ते शनिवार ( दि. २१ ) डिसेंबर या चार दिवसांच्या कालावधीत प्रभाविष्कार सोहळा सायंकाळी साडे पाच ते रात्री नऊ या वेळेत रंगणार आहे. १८ डिसेंबरला पहिल्या दिवशी प्राथमिक, माध्यमिक मराठी शाळा व बीएड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहेत. दुसर्‍या दिवशी १९ डिसेंबरला सीबीएससी होली चाईल्ड शाळा, २० डिसेंबरला होली चाईल्ड इंग्रजी माध्यम शाळा आणि २१ डिसेंबरला कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी कलागुणांचे सादरीकरण करणार आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा पार पडणार आहे. भव्यदिव्य स्वरुपात होणार्‍या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे असे पीएनपी संकुलाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.