चौल श्री दत्तयात्रेतून हरवलाय तमाशाचा फड
रसिक प्रेक्षकांची तमाश्याच्या गैरहजेरीने नाराजी
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:-गावागावातील प्रसिध्द जत्रा-यात्रा महाराष्ट्रासह रायगड जिल्हात सुध्दा आजही प्रसिध्दीस आहेत. या जत्रेंच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ठेवा तमाशा व लावणीची खरा अर्थान जपवणूक झाली आहे. असंख्य रसिक प्रेक्षक या जत्रेच्या माध्यमातून लोककलेचा आनंद लुटूत असतात. कोणी एकेकाळी तमाशा व लावणीचा फड चौल दत्तयात्रेच्या निमित्ताने रसिक प्रेक्षकांची खरी आवड होती. जत्रा म्हटली की, ढोलकीचा ताल, ढोलकीचा ठेका, लावणीचा ताल अस्सल मराठी ढोलकी व लावणीचा तोडा…मात्र चौलच्या श्री दत्त यात्रेतील तमाशा व लावणीचा फडाचा नाद हरवला असून तमाशा व लावणीच्या फडाच्या गैरहजेरीने प्रेमी रसिक प्रेक्षकांची खुप नाराजी आहे.
चौल भोवाळे पर्वतवासी श्री दत्त यात्रा संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्दीस आहे, प्रतिवर्षी पाच दिवस दत्त जयंती निमित्त या भव्य यात्रेचे नियोजन पारंपारिक पध्दतीने होत असते. सर्वात मोठी व आर्थिक उलाढालीची यात्रा म्हणून चौल श्री दत्त यात्रेची ओळख आहे. कोरोना कालावधी सोडला तर प्रतिवर्षी चौल श्री दत्तयात्रेस रायगडसह महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून चौल श्री दत्त यात्रा भाविक,पर्यटक व यात्रेकरू यांच्या प्रचंड गर्दीने भरते. महाराष्ट्रातील यात्राची परंपरेची जपवणूक चौल श्री दत्त यात्रेंने खरा अर्थाने ठेवली गेली आहे.
सुगीचे दिवस संपल्यानंतर शेतकरीवर्गास यात्राचे वेध लागतात, पावसाळी व हिवाळी हंगाम आटोक्यात आल्याने शेतकरीवर्ग आर्थिकदृष्टा तेजीत असतो. ठिकठिकाणी गावागावातून भरत असलेल्या यात्रेला भाविकतेने शेतकरीवर्ग भेटी देत आनंद व्दिगणीत करतो. चौल भोवाळे येथे पर्वतवासी श्री दत्त जयंती उत्सवाचे निमित्ताने पारंपारीक पध्दतीने श्री दत्त यात्रा भरते, या यात्रेस परिसरातील शेतकरी बंधू निश्चित येतात. चौल यात्रेच्या निमित्ताने विविध वस्तूचे स्टॉल, मिठाई, आकाश पाळणे, आदी अनेक दुकाने थाटलेली असतात.
परंतू चौल श्री दत्त यात्रेत मुख्य आकर्षण होते ते तमाशा व लावणीचा फड, काही वर्षापुर्वी तमाशा व लावणी प्रेमी रसिक प्रेक्षकांच्या मागणी व आवडीने येथे तमाश्याचे दोन फड येत असत. सांस्कृतिक कार्यक्रमाचे निमित्ताने या तमाशा फडाला मोठी गर्दी रसिक प्रेक्षकांची होत असे. तमाश्याच्या ढोलकीच्या ठेकावर व लावणीच्या तालावर येथील रसिक प्रेक्षक ठेका धरत असत. महाराष्ट्रातील अनेक प्रसिध्द तमाशा फडानी चौल श्री दत्त यात्रेच्या निमित्ताने तमाशा व लावणी कलावंतानी लोककलेची अदाकारी येथे रसिक प्रेक्षकांना सादर केली आहे.
मात्र कुठे काय बिनसले, चौल श्री दत्त यात्रेतील तमाशा व लावणीचा फड हद्पार झाला. चौल यात्रेत प्रतिवर्षी येत असलेला तमाश्याचा फडाची उपस्थिती गेले काही वर्ष होत नाही. अनेकदा रसिक प्रेक्षकांनी चौल श्री दत्त यात्रेस तमाश्याचा फड पुनस्यः सुरू व्हावा म्हणून मागणी केली, प्रयत्न केले. परंतू काहीच्या गैर मागण्याने तमाश्या फडानी चौल श्री दत्त यात्रेस तोंड फिरविल्याचा आरोप स्थानिकस्तरावर केला जातोय. व त्यामुळे आर्थिक उत्पन्नात होत असलेली घट, काहीच्या नाहक त्रासाने व सुरक्षीत भावना नसल्याने येथे तमाशा फड मंडळी येथ नसल्याचे म्हटले जातेय.
येथील रसिक प्रेक्षक मात्र तमाशा व लावणीच्या लोककलेल्या आनंदास मुकला असून सर्व स्तरातून चौल यात्रेत तमाशा फड येत नसल्याने नाराजीचा सुर येत आहे. कोणीतरी पुढाकार घेवून पुनस्यः चौल श्री दत्त यात्रेतील तमाश्या व लावणीचा फड सुरू करावा, तसेच चौल श्री दत्त यात्रेतील ढोलकीचा ताल, ढोलकीचा ठेका, लावणीचा ताल पुन्हा घुमावा व लोककलेच्या परंपरेचा आस्वाद पुनस्य रसिक प्रेक्षकांना मिळाला अशी जोरदार मागणी होत आहे.