आंबेवाडी येथे विजेचा शॉक लागून इसमाचा मृत्यू

51
आंबेवाडी येथे विजेचा शॉक लागून इसमाचा मृत्यू

आंबेवाडी येथे विजेचा शॉक लागून इसमाचा मृत्यू

आंबेवाडी येथे विजेचा शॉक लागून इसमाचा मृत्यू

✍️तेजपाल जैन ✍️
कोलाड प्रतिनिधी
📞8928847695📞

रोहा:-  तालुक्यातील आंबेवाडी येथील गणेश नगर येथे रविवार दि.१५/१२/२०२४ रोजी सायंकाळी ४.०० वाजण्याच्या सुमारास बाळाराम सखाराम तेलंगे वय वर्षे ५३ राहणार हेटवणे याचा विजेचा शॉक लागून मृत्यु झाल्याची घटना घडली असुन सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कोलाड पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहिती नुसार रविवार दि. १५/१२/२०२४ रोजी संध्याकाळी ४.०० वाजता आंबेवाडी येथील गणेश नगर येथे बाळाराम सखाराम तेलंगे राहणार हेटवणे हा वेळी काढण्यासाठी पोलावर चढला असता त्याला विजेचा शॉक लागल्याने तो खाली पडला.त्याला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी येथे आणले.येथील डॉक्टरांनी तपासले असता त्याला मयत घोषित केले. कोलाड पोलिस ठाण्यात त्यांच्या मृत्युची नोंद १७/२०२४ बी एन एस एस १९४ प्रमाणे करण्यात आली आहे.
घटनास्थळी कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते यांनी जाऊन याविषयी पंचनामा केला असुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड पोलिस ठाण्याचे अंमलदार एस जी मोरे अधिक तपास करीत आहेत.