हैवान बाप,जुळ्या मुलींवर गेली चार वर्षे करत होता बलात्कार.

57

हैवान बाप,जुळ्या मुलींवर गेली चार वर्षे करत होता बलात्कार.

पुणे :- पुण्यासारख्या सांस्कृतीक शहरात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. जन्मदात्या पित्यानेच सलग चार वर्ष जुळ्या मुलींवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्याच्या या राक्षसी कृत्याबाबत बायकोने पोलिसांत तक्रार दिली आहे. त्याच्याविरुद्ध बाललैंगिक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पुणे जिल्ह्यातील कोंढवा खुर्द येथे ही घटना घडली आहे. आरोपी पिता 4 वर्षांपासून आपल्या दोन मुलींवर अत्याचार करत असल्याचे समोर आले आहे. पीडित मुलींच्या आईने नवऱ्याविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. ज्यात तिने 4 वर्षांपासून मुलींवर बलात्कार होत असल्याचे सांगितले आहे. आरोपीचे फ्रॅब्रिकेशनचे दुकान आहे. त्याची पत्नी जून 2020 पासून आपल्या मुलांसह विभक्त राहत आहे.

2016 साली दोघींपैकी एका मुलीने पोटात दुखतंय असं सांगितलं होत. त्यानंतर तिला डॉक्टरांकडे नेले असता. त्यांनी सोनोग्राफी करायला सागितली. पण सोनोग्राफी रिपोर्ट आले असता आरोपीने ते रिपोर्ट गॅसवर ठेवून जाळून टाकले. दरम्यान एका रात्री मुलांसोबत आई बेडरुममध्ये तर आरोपी पिता हॉलमध्ये झोपले होते. रात्री अडीचच्या सुमारास मुलीचा रडण्याचा आवाज आल्याने पीडितेच्या आईला जाग आली. हॉलमध्ये आल्यावर तिने जे दृश्य पाहिले ते भयंकर होते. मुलगी फार रडत होती. तीने रडत वडिल तिच्यावर जबरदस्ती करत असल्याचे सांगितले.

मुलीकडून हा भयंकर प्रकार ऐकल्यावर आईच्या पायाखालची जमिनच सरकली. तोपर्यंत दुसरी मुलगीही झोपेतून जागी झाली. तिनेही आई घरात नसताना वडिल त्यांच्यासोबत बळजबरी करतात आणि त्यांना विरोध केल्यास सेफ्टी पिन टोचतात. एवढेच नाही तर याबाबत कोणाकडे वाच्यता केल्यास सगळ्यांना जीवे मारण्याची धमकी द्यायचे असे मुलीने सांगितले. मुलींनी आईकडे तक्रार केल्यानंतर बापाला त्याची पोलखोल झाल्याचे समजले. त्यानंतर तो तेथून फरार झाला.