नगराध्यक्षा योगिता पिपरे यांच्या स्वमालकीच्या हिंदुस्तान पेट्रोल पंप मध्ये आढळला पाणी मिश्रित पेट्रोल नागरिकांनी तक्रार नोंद वहीची केली मागणी तक्रार वहीची मागणी मालकाने चक्क फेटाळून लावली

48

नगराध्यक्षा योगिता पिपरे यांच्या स्वमालकीच्या हिंदुस्तान पेट्रोल पंप मध्ये आढळला पाणी मिश्रित पेट्रोल

नागरिकांनी तक्रार नोंद वहीची केली मागणी

तक्रार वहीची मागणी मालकाने चक्क फेटाळून लावली

नगराध्यक्षा योगिता पिपरे यांच्या स्वमालकीच्या हिंदुस्तान पेट्रोल पंप मध्ये आढळला पाणी मिश्रित पेट्रोल नागरिकांनी तक्रार नोंद वहीची केली मागणी तक्रार वहीची मागणी मालकाने चक्क फेटाळून लावली

राजेंद्र झाडे
प्रतिनिधी
मो नं 9518368177

गडचिरोली :-येथील नगर पंचायत च्या नगराध्यक्षा सौ.योगिता पिपरे यांचे पती श्री.प्रमोद पिपरे हे गडचिरोली जिल्ह्याचे भाजपा महामंत्री आहेत.प्रमोद पिपरे यांचा गडचिरोली शहर व आईटीआई चौक च्या मद्यभागी असलेल्या हिंदुस्तान पेट्रोल पंपावर पेट्रोल विक्री होत असतांना काही ग्राहकांना पेट्रोल मध्ये पेट्रोल सोबत पाणी आढळून आले.त्याच क्षणी ग्राहकांनी बॉटल मध्ये पेट्रोल घेतला असता, बॉटल मध्ये घेतलेल्या पेट्रोल मध्ये पाणी मिक्स असल्याचे दिसून आले असता नागरिकांनी तक्रार बुक मागितले.हा नागरिकांचा कायदेशीर अधिकार होता पण पेट्रोल पंप मालकाने हेतुपरस्पर तक्रार बुक दिले नाही आणि मालकांचे चिरंजीव कु.अनुराग हे विडिओ बनवणारे पत्रकार व नागरिकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करीत होते.त्याच दरम्यान समृद्ध महाराष्ट्र न्यूज चॅनलचे ब्युरो चिफ श्री.विनोद कोडापे हे प्रकरणाची सखोल चौकशी करत असताना धकाबुक्कित त्यांचा मोबाइल जमीनी वर पडून फुटला.या घटनेची माहिती भ्रमणध्वनी द्वारे जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आली.

अश्या पाणी मिश्रित पेट्रोल मुळे गाड्या खराब होण्याचा धोका आहे परिणामी या पेट्रोल पंपाला बंद करण्यात यावे अशी मागणी गडचिरोली वासीयांनी केली आहे,
पिपरे पेट्रोलपंपावर पेट्रोल ऐवजी पाणी आहे म्हणून.पण तो पाणी नसुन इथेनॉल आहे.आणि शासनाने पेट्रोल मध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याची कंपनीला परवानगी दिलेली आहे.पण आज १० टक्केपेक्षा प्रमान जास्त असल्याने पेट्रोल धारकांना गैरसमज झालेला आहे.
यामध्ये पेट्रोल मालकाची कोणत्याही प्रकारची चुक नसून ती कंपनीची चुक आहे,असे खुद्द पेट्रोल पंपाचे मालक प्रमोद पिपरे यांनी सांगितले.