श्री स्वामी विवेकानंद जयंती पुष्प पाचवे निमित्ताने न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा तर्फे पत्रकार यांचा सन्मान

159
श्री स्वामी विवेकानंद जयंती पुष्प पाचवे निमित्ताने न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा तर्फे पत्रकार यांचा सन्मान

श्री स्वामी विवेकानंद जयंती पुष्प पाचवे निमित्ताने न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा तर्फे पत्रकार यांचा सन्मान

श्री स्वामी विवेकानंद जयंती पुष्प पाचवे निमित्ताने न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा तर्फे पत्रकार यांचा सन्मान

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

श्रीवर्धन :-म्हसळा प्रतिनिधी-संतोष उध्दरकर.न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा यांच्या माध्यमातून श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह निमित्ताने विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये खो खो, कबड्डी, समुहगान, चित्रकला, रांगोळी, वेषभूषा,पाककृती, सांस्कृतिक कार्यक्रम असे भरघोस कार्यक्रम आयोजित करून विध्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असतो, आजचे पाचवे पुष्प या निमित्ताने म्हसळा तालुक्यातील सर्व पत्रकार यांना आमंत्रित करुन न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा या शाळेचे चेअरमन समीर बनकर यांच्या हस्ते सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला, या वेळी जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे, पत्रकार अशोक काते, उदय कळस, शशिकांत शिर्के, महेश पवार, सुशील यादव,संतोष उध्दरकर, वैभव कळस, अरुण जंगम, आदी पत्रकार उपस्थित होते, या कार्यक्रमात पत्रकार सुशील यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा देणे आवश्यक आहे आणि मोबाईल सारख्या मृगजळामध्ये अडकून राहु नका, तसेच जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे यांनी देखील विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले , विविध प्रकारच्या स्पर्धा परिक्षा देणे आवश्यक आहे,शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले,यावेळी डॉ बापुजी सांळुखे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत बापुजी यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थांच्या माध्यमातून अनेक खेडोपाड्यतील विद्यार्थ्यी यांच्या साठी शिक्षणाचे दरवाजे उघडले,अशोक काते यांनी देखील सप्ताह निमित्ताने विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व संस्थापक अभयकुमार सांळुखे यांचा आज वाढदिवस असल्याने पत्रकारांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ,चेअरमन समीर बनकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की पत्रकार हा चौथा आधार स्तंभ म्हणून गणला जातो व यांच्या लेखणीला एवढी धार असते की भल्याभल्यांना शस्त्र खाली ठेवावी लागतात,सामान्य जनतेला न्याय देण्याचे महत्त्वाचे काम करतो तो म्हणजे पत्रकार. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरे सर यांनी केले तर प्रस्थाविक गायकवाड सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार वसावे सर यांनी मांडले. यावेळी सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थिती होते. तसेच आज खो खो चा अंतिम सामन्याचे उदघाटन जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले.