श्रीराम जन्मभूमी अयोध्या राममंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहा. मा. सभापती महेंद्र तेटगुरे यांचे आवाहन…
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
लोणेरे गोरेगाव :-२२ जानेवारी रोजी श्री राम जन्मभूमी “अयोध्या नगरीमध्ये” भगवान श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा “श्री राम नवमी” मुहूर्तावर साजरा करण्यात येत आहे याकरिता अवघ्या देशभरातून मोठ्या उत्साहात सोहळा भव्यदिव्य करण्या संदर्भात लोणेरे ग्रामपंचायत कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी माणगांव तालुक्यातील “लोणेरे व लोणेरे परिसरातील रामभक्त गणांच्या वतीने 22 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता लोणेरे सोन भैरव मंदीर ते राममंदिर नवघर येथे सात वाजता महाआरती घेऊन कार्यक्रमाची सांकता होणार आहे यावेळी अनेक भक्तिगण तसेच वारकरी संप्रदाय, विद्याथी तसेच लोणेरे परिसरातील अनेक भक्तगण पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करुन मिरवणूकीमध्ये सहभागी होऊन कार्यक्रम ची शोभा वाढवावी असे आवहन पं. स. माजी सभापती महेंद्र तेटगुरे यांनी प्रसिद्धी माध्यमातून केली आहे. यावेळी श्री राम उत्सव कमिटी लोणेरे तसेच पचक्रोशीतील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.