आज विदर्भस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा

37
आज विदर्भस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा

आज विदर्भस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा

आज विदर्भस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 18 जानेवारी
आ. किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत शनिवार, 18 जानेवारी रोजी विदर्भस्तरीय शरीर सौष्ठव अजिंक्यपद स्पर्धा येथील गांधी चौकातील महापालिकेच्या पटांगणावर सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत विदर्भातील 100 हून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. हरियाणाचे मिस्टर वर्ल्ड नरेंद्र यादव हे या स्पर्धेचे विशेष आकर्षण असतील. स्पर्धेतील विजेत्यांना आमदार श्री 2025 पुरस्कार रोख 55 हजार 555, बेस्ट पोझरला 33 हजार 333, तर बेस्ट इम्प्रूव्हला 22 हजार 222 आणि चषक देण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या महोत्सवात कुस्ती, कबड्डी, शरीर सौष्ठव अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.