Financial crisis on the beneficiaries of Shravanbal Yojana and Sanjay Gandhi Niradhar Yojana.
Financial crisis on the beneficiaries of Shravanbal Yojana and Sanjay Gandhi Niradhar Yojana.

श्रावणबाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थीवर आर्थिक संकट.

Financial crisis on the beneficiaries of Shravanbal Yojana and Sanjay Gandhi Niradhar Yojana.
Financial crisis on the beneficiaries of Shravanbal Yojana and Sanjay Gandhi Niradhar Yojana.

घाटंजी:- तालुक्यातील व शहरातील श्रावणबाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी शासनाकडून त्यांना प्राप्त व्हावयाचे वेतन व लाभ मागील तीन ते चार महिन्यांपासून थकीत आहे. त्यामुळे या योजनेवर अवलंबून असलेल्या निराश्रित, निराधारांना विविध प्रकारच्या आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

या लाभार्थ्यांना त्वरित थकीत रक्कम द्यावी व त्यांची आर्थिक परवड दूर करावी, अशी मागणी घाटंजी नगर परिषद अध्यक्ष व नगरसेवकांनी जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनात म्हटले आहे, श्रावणबाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेंतर्गत या लाभार्थ्यांना देय असलेली वेतन व लाभाची रक्कम थकीत राहत असल्याने या त्यांना विविध आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तरी यावर तत्काळ तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

याप्रसंगी नायब तहसीलदारांना नप अध्यक्ष नयना ठाकूर यांच्या नेतृृत्वात निवेदन देताना नगरसेवक सय्यद फिरोज, बांधकाम सभापती विक्रम ठाकूर, आरोग्य सभापती अनिल खोडे, सभापती सुमित्रा मोटघरे, सभापती अर्चना जाधव, नगरसेवक सीता गिनगुले, सलीम छुट्टाणी, जफर पटेल, विनोद महाजन, सय्यद रमीज, रोषणा आडे, सय्यद मुजीब, शुभम राठोड हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here