वडणेर येथे राष्ट्रीय जल अभियानाचे उदघाटन.

Inauguration of National Water Mission at Wadner.
प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी
वडणेर:- नेहरू युवा केंद्र वर्धा युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकार व युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय जल अभियानाचा उदघाटन संपन्न. वडणेर येथील युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्था व नेहरू युवा केंद्र वर्धा युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आर. टी. आय कॉम्पुटर अँड टेकनिकल इन्स्टिट्यूट वडणेर येथे जलशक्ती अभियान कार्यक्रमाचे आयोजन केले. सर्वप्रथम स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पाणी बचाव अशी शपथ घेण्यात आली, कार्यक्रमांस सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दूरतकर, मार्गदर्शक वडणेर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई लक्ष्मण केंद्रे, प्रमुख पाहुणे स्थानीय प्रबंधन समितीचे उपाध्यक्ष विकास तिजारे, मुख्याध्यापिका सौ. आरतीताई बोरकर, शिक्षिका कु. विभा गुरनुले, कु. मिनल जारोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाण्याचा वापर कसा करावा पाणी कस वापरावे, पाण्याचे योग्य नियोजन करणे काळाची गरज आहेत असे मत युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्थेचे अध्यक्ष राहुल दुरतकर यांनी व्यक्त केले. पाणी हे जीवन असून युकांनी पाणी नियोजन करण्यासाठी प्रबोधन पर कार्यक्रम घेऊन समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करावे असे मत वडणेर पोलीस स्टेशन चे पोलीस शिपाई लक्ष्मण केंद्रे यांनी व्यक्त केले. जल या विषयाशी आत्मीयता निरामन करा असे मत विकास तिजारे यांनी केले. या प्रसंगी नेहरू युवा केंद्राचे तालुका स्वयंसेवक सचिन महाजन, शिक्षिका विभा गुरनुले, मीनल जारोंडे, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.