Public admission of Shiv Sena workers and social organization office bearers in 'Vanchit'.
Public admission of Shiv Sena workers and social organization office bearers in 'Vanchit'.

शिवसेना कार्यकर्ते व सामाजिक संघटना पदाधिकारी यांचा ‘वंचित’ मध्ये जाहीर प्रवेश.

Public admission of Shiv Sena workers and social organization office bearers in 'Vanchit'.
Public admission of Shiv Sena workers and social organization office bearers in ‘Vanchit’.

बार्शिटाकळी:- अकोला जिल्हातील बार्शिटाकळी येथे वंचित बहूजन आघाडीची वाढत असलेली लोकप्रियता बघून अनेक पक्षाचे नेते आणी कार्यकर्त्यांनी वंचीत मध्ये प्रवेशाचा सपाटा लावला आहे.

बार्शिटाकळी तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते श्रीकृष्ण देवकुणबी, अनिल महल्ले, गणेश पारसकर ग्रा पं सदस्य पुणोती बु, सुबोध गवई ग्रा पं सदस्य पुणोती बु, सुरेश इंगळे ग्रा पं सदस्य पुणोती बु, रतन आडे बंजारा समाज संघटना शहर अध्यक्ष अकोला, हरिष रामचवरे जय भोले मित्र मंडळ आळंदा, सुधाकर मोहोळ, दिनकर देवकुणबी, योगेश सोनाग्रे
यांनी श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व स्वीकारुन आज जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला.

प्रवेशा वेळी वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ते तथा युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जि प सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, बार्शिटाकळी पंचायत समिती सभापती प्रकाश वाहुरवाघ, पंचायत समिती सदस्य दादाराव पवार, रोहिदास राठोड, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे, डॉ. निलेश उन्हाळे, अमोल जामनिक, नितीन सपकाळ, संतोष वनवे, सह प्रसिध्दी प्रमुख विकास सदांशिव, सचिन लाखे, संजय वाडकर आदि प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here