बापानेच केली स्वताःचा मुलाची कुऱ्हाडीने वार करून हत्या.

63

बापानेच केली स्वताःचा मुलाची कुऱ्हाडीने वार करून हत्या.

एक वर्षाच्या मुलाला केल बापा पासुन पोरकं.

The father killed his own son with an ax.
The father killed his own son with an ax.

प्रशांत जगताप प्रतीनीधी
हिंगणघाट:- वर्धा जिल्हातील आजनसरा येथे बापाने आपल्या पोटच्या विवाहित मुलाची हत्या केल्याचे समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रमोद काचोळे वय 30 वर्ष असे मृताचे नाव आहे, तर अरुण काचोळे वय 56 वर्ष असे आरोपी बापाचे नाव असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पोलिस सूत्रांनुसार, आजनसरा येथील आरोपी अरुण कचोळे हे दोन विवाहित मुले विनोद व प्रमोद व पत्नी यांच्यासोबत राहत होते. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून अरुणला दारूचे व्यसन जडले. यातून त्याचे मुलांसोबत नेहमीच भांडण होत होते. त्यामुळे प्रमोद गत दोन वर्षांपासून गावातच घर किरायाने घेऊन वेगळे राहत होते. प्रमोद हा शेती मालवाहतूक व पानठेला चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. दोन वर्षांपूर्वीच प्रमोदचा विवाह झाला असून त्याला एक वर्षाचा मुलगा आहे.

घटनेच्या दिवशी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास प्रमोद हा नेहमीप्रमाणे शेतात गेला असता, अरुण काचोळे दारूच्या नशेत शेतात आला व प्रमोदला शिवीगाळ करू लागला. त्यामुळे प्रमोदने समजविण्याचा प्रयत्न केला असता तो अंगावर धावून गेला. हातातील कुऱ्हाडीने प्रमोदवर वार केले. यात प्रमोद गंभीर जखमी झाला. याची माहिती शेजारी शेतात काम करीत असलेल्या चाफले यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना प्रमोद गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.

चाफले यांनी सदर घटनेची माहिती त्याचा मोठा भाऊ विनोद यांना दिली. त्यामुळे विनोदने घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी अवस्थेत प्रमोदला वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. यात मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव झाल्याने पुढील उपचारासाठी सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात पाठविण्यात आले. तिथे उपचारादरम्यान प्रमोदचा मृत्यू झाला. आरोपी बाप अरुण काचोळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार शेट्‌टे, पोलिस उपनिरीक्षक राजू सोनपित्तरे, अजय वानखेडे, लक्ष्मण केंद्रे, प्रवीण बोधाने, विनोद राऊत पुढील तपास करीत आहे.