१६ फेब्रुवारीला दिल्ली पोलिसांच्या ७५ व्या स्थापना दिवशी जाहीर करण्यात आला होता नवीन लोगो

सिद्धांत
१७ फेब्रुवारी, मुंबई: १६ फेब्रुवारीला २०२२ ला दिल्ली पोलिसांच्या स्थापनेला ७५ वर्ष पूर्ण झाली. या दिवसाचे औचित्य साधून दिल्ली पोलिसांनी आपला नवीन लोगो जाहीर केला. हा नवीन लोगो कालपासून दिल्ली पोलिसांच्या वर्दीवर, तसेच कार्यालयीन कागपत्रांवर वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कसा होता जुना लोगो?
१९४८ साली दिल्ली पोलिसांची स्थापना करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांच्या मूळ लोगोमध्ये सम्राट अशोकाच्या अशोकस्तंभाचा समावेश होता. अशोकस्तंभाखाली सत्यमेव जयते हे घोषवाक्य लिहिण्यात आलेले होते . सोनेरी, लाल आणि निळ्या रंगाने बनलेल्या या लोगोमध्ये शांती, सेवा, न्याय हे ब्रीदवाक्य लिहिण्यात आलेले होते.
नव्या लोगोमध्ये अशोकस्तंभाला स्थान नाही?
१६ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आलेल्या नवीन लोगोमध्ये अशोकस्तंभाला हटवून त्याच्या जागी दिल्लीतील इंडिया गेटला स्थान देण्यात आलेले आहे, अशी टीका दिल्ली पोलिसांवर करण्यात आली होती. मुख्यतः लाल आणि सोनेरी रंगाने बनलेल्या या नव्या लोगोच्या खाली “फॉर द नॅशनल कॅपिटल” ( देशाच्या राजधानीसाठी) असे लिहिण्यात आले आहे. सम्राट अशोक राजाच्या अशोकस्तंभाला भारत देशाचे राष्ट्रीय प्रतीक म्हणून मान्यता आहे. तर दिल्लीतील इंडिया गेट पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिश-इंडिया सैन्यातील मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ १९३१ साली बांधण्यात आला होता.
दिल्ली पोलिसांचे स्पष्टीकरण:
1954 में तत्कालीन राष्ट्रपति महोदय द्वारा दिल्ली पुलिस को इंडिया गेट अंकित "कलर्स" से सम्मानित किया गया था।
दिल्ली पुलिस के 75वें स्थापना दिवस पर इस सम्मान की स्मृति में इसे पुलिस ड्रेस कोड का हिस्सा बनाया गया है।(1/2)@ANI@PTI_News pic.twitter.com/hVqg5alct2— Delhi Police (@DelhiPolice) February 17, 2022
ह्या संपूर्ण विवादावर ट्विटद्वारे स्पष्टीकरण देताना दिल्ली पोलिसांनी सांगितले कि, १९५४ साली तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली पोलिसांना इंडिया गेट असलेले हे चिन्ह पुरस्काराच्या स्वरूपात दिले होते. दिल्ली पोलीस दलाने ७५ व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर त्या जुन्या पुरस्काराचा आदर करण्याच्या हेतूने या नवीन लोगोला पोलिसांच्या वर्दीचा एक भाग बनवण्यात आलेला आहे. अशोकस्तंभ हा दिल्ली पोलिसांच्या प्रतीक चिन्हाचा अविभाज्य भाग आहे. दिल्ली पोलिसांना देशाच्या राष्ट्रीय प्रतीकांचा आदर आहे.