गोवा येथे आयोजित ऑस्ट्रेलिया क्रीडा स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या वतीने दिली मदत.

✍️मुकेश मेश्राम✍️
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखनी:आई वडील शेतकरी… जेमतेम परिस्थिती… ना मोठे विशेष मैदान ना विशेष प्रशिक्षक… मात्र तरीही भंडारा जिल्ह्यातील एक शेतकरी कन्या आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेत नेपाळ येथे होणाऱ्या क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तेजस्विनी नरेंद्र लांबकाने ही भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील दिघोरी या एका छोट्याशा गावची मुलगी. नुकतीच गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिने 5 किलो मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.
तेजस्विनी अगदी सुरुवातीपासून मैदानावर उत्तम सराव करते आणि उत्तम धावपटू म्हणून ती प्रसिद्ध असली तरी विविध खेळामध्ये देखील ती अग्रेसर राहते. घरची जेमतेम परिस्थिती असतानाही तेजस्विनीने हे यश प्राप्त केलेलं आहे. तेजस्विनीचे आई वडील हे शेती काम करतात आणि तेजस्विनी सध्या शारीरिक शिक्षण महाविद्यालय नागपूर येथे प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे.
भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातूनही पुढे येत तेजस्विनीने भारतातील बहुतांश राज्यांमध्ये मॅरेथॉनमध्ये यशस्वी धावपटू म्हणून ठसा उमटवलेला आहे आणि राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक प्राप्त करून आता ती आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणार आहे.
आपल्या भागातील एक युवती आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा जगतात नाव मोठे करत आहे, ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे, तिच्या पुढील प्रवासासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांनी तेजस्विनीला आर्थिक मदत दिलेली आहे.
सदर मदत देताना लाखनी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजू निर्वाण, ज्येष्ठ नेते शफ़ीभाई लद्धानी, माजी जि. प. सदस्य आकाश कोरे, आमीर अकबानी, तंटामुक्त समिती अध्यक्ष नरेंद्र लांबकाने, दीपक खोब्रागडे, माजी सरपंच विनोद हलमारे, पुरुषोत्तम हलमारे, माजी उपसरपंच धनंजय हलमारे, मुन्ना देशमुख, लव्हा बडोले, समता सैनिक दलाच्या अध्यक्षा प्रमिला लांबकाने, मुख्याध्यापक प्रमोदबापू हटेवार यांच्यासह तेजस्विनीचे आई वडील देखील उपस्थित होते.