पुण्यात उद्यापासून सुरु होणार रसाळ द्राक्षांचा महोत्सव

या महोत्सवात https://bit.ly/3tUCoQL या गूगल लिंकवर जाऊन आपला सहभाग नोंदवावा

पुण्यात उद्यापासून सुरु होणार रसाळ द्राक्षांचा महोत्सव

मीडिया वार्ता न्युज
१७ फेब्रुवारी, मुंबई: महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामार्फत पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे 18 ते 20 फेब्रुवारी या काळात दिवस द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात द्राक्षांच्या बागांतून फेरफटका
द्राक्षांच्या विविध व्यंजनांचा स्वाद चाखण्याची संधी मिळणार आहे. या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच खाद्य महोत्सवकृषी पर्यटन आदीचे आयोजन करण्यात आले आहे.

जुन्नर मध्ये आयोजित द्राक्ष महोत्सवाचे पाचवे वर्ष आहे. या महोत्सवात पर्यटन व्यवसायाला चालना मिळेलतसेच कलाकुसर करणारे कारागीरबचतगटलघु उद्योजकांच्या व्यवसायाला हातभार लागेल.

यामध्ये विविध जातींची द्राक्षेद्राक्षांपासून बनवलेल्या विविध खाद्यपदार्थांचा तसेच बहारदार द्राक्षांच्या बागांमध्ये फिरण्याचा अनुभव घेता येणार आहे. महोत्सवामुळे पर्यटकांना हेरीटेज वॉक अंतर्गत जुन्नर शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा पाहण्याची संधी मिळणार असूनया वॉकमध्ये पंचलिंग मंदिरशिवसृष्टीमुघलकालीन खापरी पाईपलाईनसौदागर घुमटहबशी महाल इत्यादी ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. रात्री पर्यटकांसाठी कॅम्प फायरची व्यवस्था असणार आहे.

पर्यटकांसाठी पक्षी निरीक्षणाची संधी

जुन्नरमधील देवराईमध्ये किंवा वनपरिक्षेत्रांत निसर्गप्रेमी आणि पक्षीप्रेमींना पक्षी निरीक्षण उपक्रमात सहभागी होता येणार आहे. तसेच कुकडेश्वर मंदिरनाणेघाट इत्यादी ठिकाणी भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. शेवटच्या दिवशी हडसर किल्ला किंवा पर्वत गडावर ट्रेकिंगचे आयोजन केले जाणार आहे. त्यानंतर ओझर गावातील गणपतीगीब्सन स्मारकअंबा अंबिका लेणी समूहताम्हाणे संग्रहालयलेण्याद्री गणपती आदींचे दर्शन घेता येईल. तसेच स्थानिक जुन्नरच्या आठवडी बाजारांमध्ये जाऊन तेथील बाजार पाहता येईल व खरेदी करता येईल.

 

हे आपण वाचलंत का?

 

 पर्यटक इथे येऊन शेतातील ताज्या द्राक्षांचा आस्वाद घेऊ शकतात. पर्यटकशेतकरी आणि व्यावसायिक समूदाय यांनी एकत्र येऊन द्राक्षाच्या बाजारपेठेसाठी आर्थिकदृष्ट्या उचललेले हे अत्यंत महत्वाचे पाऊल असणार आहेअशी माहिती पर्यटन विभागाच्यापुणे येथील उपसंचालक सुप्रिया करमरकर यांनी दिली आहे.

 या महोत्सवात https://bit.ly/3tUCoQL या गूगल लिंकवर जाऊन आपला सहभाग नोंदवावाअसे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here