नगर परिषदेवर शेतकरी कामगार पक्षाने काढला विशाल मोर्चा फुटपाथ धारकांच्या मोर्चाला पाहून मुख्याधिकारी बैठकीच्या नावाने झाले गायब…

52

नगर परिषदेवर शेतकरी कामगार पक्षाने काढला विशाल मोर्चा
फुटपाथ धारकांच्या मोर्चाला पाहून मुख्याधिकारी बैठकीच्या नावाने झाले गायब…

नगर परिषदेवर शेतकरी कामगार पक्षाने काढला विशाल मोर्चा फुटपाथ धारकांच्या मोर्चाला पाहून मुख्याधिकारी बैठकीच्या नावाने झाले गायब…

✍ विनोद कोडापे✍
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
8380802959

गडचिरोली शहरातील अनेक जन फुटपाथवर दुकाने सुरू करून आपली उपजीविका करत आहेत. ही फुटपाथ दुकाने अत्यंत बळजबरीने आणि एकतर्फी, द्वेषभावनेतून करण्यात येत असून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत सदर अतिक्रमण काढण्याची कारवाई थांबविण्यात यावी यासाठी शेतकरी कामगार पक्षातर्फे नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा येणार असल्याची माहिती असल्याने, मोर्चेकऱ्यांना सामोरे न जाता मुख्याधिकारी विशाल वाघ हे बैठकीचे नावाने गायब होते, बैठक संपल्यावर मुख्याधिकारी आंदोलन स्थळी येणार या आशेने शेकडो फुटपाथ दुकानदार ठाण मांडून बसले होते.अखेर मला घरगुती लग्नाचे काम असून मी आता येऊ शकत नाही असे मुखाधिकारीनी म्हणताच, आंदोलनकरत्यांनी माघार घेणार नसल्याचे सांगताच,आंदोलन चिघळणार या भीतीने पोलिस प्रशासनाने सर्वांना ताब्यात घेतले,काही वेळानंतर सोडण्यात आले.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जयश्री वेळदा, शामसुंदर उराडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, मिलींद बांबोडे, विवेकराजे बारसिंगे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा गांधी चौक ते नगर परिषद दरम्यान काढण्यात आला होता.
मोर्चात शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते चंद्रकांत भोयर, देवेंद्र चिमनकर, प्रहार जनशक्तीचे निखिल धार्मिक, मंगेश पोरटे, प्रभाकर शेंडे,संदिप निशाणे, उमाकांत लांजेवार, भाऊराव भगत, विजय शेंडे, सलमान खान, उमेश वैरागडे, हुसेन शेख, लालू कोवासे, अनिल मट्टामी, गणेश हिचामी, हितेश करकाडे, शिवराम हिडामी, रामलाल मट्टामी, एकनाथ उंदिरवाडे, रुमाजी कुनघाडकर, लंकेश्वर खोब्रागडे, रविंद्र सोनटक्के, दाविन गडकरी, मोरुभाऊ रामटेके यांचेसह शेकडो फुटपाथ धारक उपस्थित होते.