लालच….
मोबाईल टॉवर उभारून नागरिकांच्या घटनादत्त अधिकारचे हणन
वारंवार तक्रार,निवेदन मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष
✍क्रिष्णा वैद्य✍
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
9545462500
ब्रम्हपुरी :- विद्यानगर ब्रम्ह्पुरी येथील कावळे लेआउट येथे २०१८ मध्ये जिओ मोबाईल टॉवर विषयी नगर परिषद मुख्यधिकारी यांनी टॉवर बांधकामास कुठलीही परवानगी दिली नसतांना नामदेव कावळे याच्या मालकीच्या प्लॉट मध्ये टॉवरचे बांधकाम पूर्णतःवास आले.मोबाइल टॉवर बसविण्यापूर्वी त्यापासून होणारा किरणोत्सर्ग व त्याचे दुष्परिणाम याबद्दल योग्य माहिती आजूबाजूच्या रहिवाशांना दिली नाही व जनतेला अंधारात ठेवून जगण्याच्या अधिकारावर गदा आणल्याचा आरोप परिसरातील नागरिक करीत आहेत.
विद्यानगर ब्रम्ह्पुरी येथिल कावळे ले आऊट मधील प्लॉट धारकांनी टॉवर ला विरोध करून प्रशासनास अनेक तक्रार,निवेदने सादर केली परंतु त्यांच्या निवेदनास कुठलेही उत्तर प्रशासना मार्फत मिळाले नाही. जिल्हाधिकारी साहेबांनी २०१८ मध्ये कार्यवाही करण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांच्या आदेशाची दखल उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत झालेले दिसून आली नाही व टॉवर बांधकामाचा प्रश्न अनुत्तरित राहिला. २०१९ मधे टॉवर बांधकाम सुरु झाले मात्र २०१९ ते २०२१ या काळात कुठंलेही टॉवर बांधकाम सुरु नसल्याने त्यावेळेस रहिवाशांनी मोकळा श्वास घेतला. त्यांना असे वाटले की, प्रशासनाने आपल्या निवेदनाची दखल घेतली असावी. परंतु २०२१ ला अचानक पणे टॉवरच्या कामास सुरुवात झाले तेव्हा रहिवाशांनी पुन्हा मुख्यधिकारी, तहसीलदार, आणि उप विभागीय अधिकारी यांना निवेदनामार्फत माहिती देण्यात आली. परंतु प्रशासन स्तब्ध आहे. आजतागायत विद्यानगर येथिल रहिवाशी लढा देत आहेत परंतु प्रशासन जनतेचे प्रश्न सोडविन्यात असमर्थ राहिले.
दिनांक १५/२/२०२२ रोजी मा. जिल्हाधिकारी साहेबांना पुन्हा निवेदनामार्फत २०१८ पासूनच्या कार्यवाहीचा आढावा देऊन टॉवर बांधकामास दिलेली परवानगी रद्द करण्यात यावी अशी विनंती करीत नागरिकांच्या शरीरातील पेशींची वाढ विकृत करणारा सजीवांच्या DNA च्या रासायनिक संरचनेला हानी पोहोचविणारा, मेंदूच्या रक्तप्रवाहात अडथळे आणून स्मरणशक्ती कमी करून विविध विकार निर्माण करणारा, हृदयाची गती वाढविणारा, प्रजननसंस्था व संपूर्ण केंद्रीय मज्जासंस्थेवर अनिष्ट परिणाम घडवून आणणारा व विविध प्रकारच्या कर्करोगाला आमंत्रण देणारा अत्यंत हानीकारक असा मोबाइल टॉवरमुळे होणारा किरणोत्सार टाळण्यासाठी या भागात असा टॉवर होऊ द्यायचा नाही अन्यथा टॉवर न हटविल्यास विद्यानगर येथिल नागरिक प्रशासना विरुद्ध जन आन्दोलनाची भूमिका घेणार असे विद्यानगरवासियांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदना द्वारे म्हटले आहे