घाटसावली येथे शिव सेना शाखेचे उदघाटन संपन्न
✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
वर्धा : – दिनांक १६/०२/२०२२ रोज बुधवार ला घाटसावली येथे शिव सेना शाखेचे उदघाटन झाले. सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजा अर्चना केली.त्यानंतर शाखेच्या व शाखेच्या फलकाच्या अनावरण मा. जिल्हा उप प्रमुख श्री राजेंद्र खुपसरे, तालुका प्रमुख श्री सतीश धोबे, उप तालुका प्रमुख श्री प्रकाश अनासाने,कुटकी सर्कल प्रमुख श्री विनोद चाफले, उप सर्कल प्रमुख श्री विनोद मोहाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या ठिकाणी श्री प्रकाश अनासाने यांनी पक्ष बांधणी साठी युवा पिडीने ने पुढे आले पाहिजे, गाव तिथे शाखा, घर तिथे झेंडा. तसेच सतीश धोबे यांनी आपले मनोगतात सांगितले कि शिव सेना हा पक्ष प्रत्येक मराठी माणसाचा विचार आहे, वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराने सर्व साधारण लोक मोठी झाली आणि हि किमया फक्त शिव सेनेतच आहे आज बेमी च्या डेटा पासून खोटे बोलणाऱ्या या भाजपा साठी शिव सेना हि काळाची गरज आहे.आज गॅस सिलेंडर चे भाव ग्रामीण भागातील सर्व साधारण परिवाराला परवडणारे नाही आणि म्हणून ग्रामीण ची मंडळी आज हि चुलीचा वापर करीत आहे . हि वेळ या bjp वाल्यांनी आपल्यावर आणली आहे त्यामुळे या फेकू लोकांच्या नांदी लागू नका म्हणून लोकांना जागृत करा. तचेच या ठिकाणी राजेंद्र खुपसरे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले कि या पक्षांनी साधारण व्यक्ती ला मोठे केले पण पक्षाच्या कार्यकर्ता आपल्या रक्ताचे पाणी करून पक्षाला प्रामाणिक राहिला पण काही लोक आपल्या स्वार्थासाठी सोडून घेले, पण पक्षाला काहीच फरक पडला नाही आणि फरक पुढेही पडणार नाही,आणि म्हणून त्याच जोमाणे उद्धव साहेबांच्या हात बळघट करण्यासाठी पुन्हा शिव सेनेचा झेंडा घेऊन कामाला लागा, मला आपल्यावर पूर्ण विश्वास आहे.हे चित्र हिंगणघाट शहर आणि ग्रामीण मध्ये दिसतय. या ठिकाणी सर्कल प्रमुख विनोद चाफले यांनी सांगितले कि जुना वैभव पुन्हा पक्षाला येईल, आणि शिव सेनेचा झेंडा संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक गावात फडकेल. या ठिकाणी शाखा प्रमुख श्री शाम सोनटक्के, उप शाखा प्रमुख श्री गजानन ठाकरे, सचिवपदी श्री सुशांत उमक, कोषाध्यक्ष श्री करण धोपटे यांची नियुक्ती श्री सतीश धोबे यांनी केली.सदस्य म्हणून श्री प्रफुल सोनटक्के, वैभव झाडे, हर्षल वाटकर, वैभव डोंगरे, हर्षल बिडकर, नयन पेंदाम,सुरज किन्नाक्के,अजय पडाल, अमोल बिडकर, निखिल काकडे नियुक्ती झाली. या ठिकाणी मोठया संख्येने त्या गावातील लोक उपस्तीत होते.