सी.टी.पि.एस. मध्ये कामावर जात असताना भोजराज मेश्राम यांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू सी.टी.पी.एस.मधील कामगार*हिंस्त्रक प्राण्यांपासून असुरक्षित;-राजू झोडे

60

सी.टी.पि.एस. मध्ये कामावर जात असताना भोजराज मेश्राम यांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू

सी.टी.पी.एस.मधील कामगार*हिंस्त्रक प्राण्यांपासून असुरक्षित;-राजू झोडे

सी.टी.पि.एस. मध्ये कामावर जात असताना भोजराज मेश्राम यांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू सी.टी.पी.एस.मधील कामगार*हिंस्त्रक प्राण्यांपासून असुरक्षित;-राजू झोडे

सौ हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्यूज चंद्रपूर
मो. 9764268694

चंद्रपुर: सविस्तर वृत्त असे आहे की दुर्गापूर येथील भोजराज मेश्राम हे औष्णिक विद्युत केंद्र ऊर्जानगर येथे कंत्राटी कामगार म्हणून काम करत होते. ते रात्री आपल्या कामावर जात असताना औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरात वाघाने त्याच्यावर हल्ला करून ठार केले. त्यामुळे कामावर जाणाऱ्या कामगारांमध्ये भीतीचे वातावरण असून कामगारांना सिटीपीएस प्रशासनाने आवश्यक त्या सुविधा पुरवाव्या व परिसरातील वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय योजना कराव्यात याकरिता वंचित बहुजन आघाडीचे नेते राजु झोडे यांनी प्रशासनाकडे मागणी केली.
महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात मोठमोठ्या कंपन्या आहेत त्याचप्रमाणे कंपन्या लगत मोठ्या प्रमाणात जंगले सुद्धा आहेत. या जंगलांमध्ये हिंसक प्राणी असल्याने वते कंपनी च्या आत मध्ये शिरगाव करत असल्याने कंपनीमध्ये काम करणार्‍या कामगारांच्या जीवाला धोका तयार झालेला आहे. वाघ, बिबट, अस्वल या परिसरात वावरत असून मागच्याच प्रकरणात आईच्या कुशीतून वाघाने एका मुलाला उचलून नेले तरीही सीटीपीएस प्रशासनाने याबाबत कोणतीही गांभीर्याने दखल घेतलेली नाही. या जिल्ह्यातील पालकमंत्री, वन मंत्री, व येथील लोकप्रतिनिधींनी याबाबत कठोर पावले उचलावीत व कामगारांच्या सुरक्षितेसाठी योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी राजू झोडे यांनी व मृत परिवाराच्या सदस्यांनी तसेच कामगारांनी शासन व प्रशासनाकडे केली.
जर वरीलमागणी तात्काळ पूर्ण झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी द्वारा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राजु झोडे यांनी दिला.