ग्रीनफ्रेंड्स तर्फे ‘बर्ड अँड बटरफ्लाय’ निरीक्षण उपक्रम
लाखनी परिसरात विविध भागात हिवाळी स्थानिक पक्षी-फुलपाखरू निरीक्षण
जागतिक पाणथळ दिनानिमित्त उपक्रमाचे आयोजन
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखनी:-ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे विद्यार्थी नागरिकांना निसर्गाविषयी माहिती मिळावी व त्याद्वारे निसर्गसंवर्धन व्हावे याकरिता अनेक उपक्रम प्रत्यक्ष स्वरूपात मागील 20 वर्षापासून घेतले जातात याअंतर्गत दरवर्षी पावसाळी,हिवाळी,उन्हाळी स्थानिक ‘पक्षी व फुलपाखरू’ निरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येतात.जागतिक पाणथळ दिनाच्या निमित्ताने हिवाळी ‘बर्ड अँड बटरफ्लाय’ निरीक्षण उपक्रम लागोपाठ दोन रविवार लाखनी परिसरात घेण्यात आला.
यावेळी ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने यांनी जागतिक पाणथळ दिनाच्या निमित्ताने पाणथळ संवर्धनाविषयी सखोल व विस्तृत माहिती सहभागी विद्यार्थ्यांना दिली.लाखनी परिसरातील मानेगाव तलाव,लाखनी मानेगाव मार्ग,बसस्थानकावरील ग्रीनफ्रेंड्सने तयार केलेला ‘नेचर पार्क’,सावरी तलाव व सावरी स्मशानभूमीवर ग्रीनफ्रेंड्स ने केलेले वृक्षारोपण स्थळ, त्याचप्रमाणे शेंदरे नर्सरी, लाखनी तलाव व सेवानिवृत्त इंजिनिअर राजेश गायधने यांची तलावाजवळील प्रयोगात्मक जैविक व औषधी वनस्पती वेखंड शेती या ठिकाणांना भेट देऊन विविध प्रजातीचे पक्षी -फुलपाखरे,किटक,चतुर तसेच विविध वनस्पतींचा निरीक्षण आणि परिचय सहभागी विद्यार्थ्यांना करून देण्यात आला.या उपक्रमाला नेफडो जिल्हा शाखा भंडारा व अभा अंनिस तालुका शाखा लाखनी जिल्हा शाखा भंडारा यांचे सहकार्य लाभले
यावेळी लिटिल कॉरमरंट, रेड वॉटल लैपविंग,ब्लॅक ड्रोनगो,फिझंट टेल्ड जकाना, ब्रॉंझ विंगेड जकाना, पर्पल स्व्यामप हेन, व्हाइट ब्रिस्टेड किंगफिशर, कॉमन किंगफिशर ,पाइड किंगफिशर, ग्रीन बी इटर,कॉमन काईट, कॉटन पिग्मी टिल, ओपन बिल स्टार्क, पान्ड हेरॉन,लिटिल इग्रेट, कॅटल इग्रेट, जंगल क्रो,स्पॉटेड मुनिया,कॉमन स्विफ्ट,रेड वेंटेड बुलबुल,लाफिंग डोव, रेड कॉलर्ड डव ,रेड मुनिया,व्हाइट ब्रोड बुलबुल,इंडियन रोलर जे, पर्पल सनबर्ड,व्हाइट ब्रो व्यागटेल,ग्रेटर कौकल,कॉमन स्विफ्ट इत्यादी पक्षी प्रजाती आढळल्या. तर फुलपाखरामध्ये व्हाइट पॅनजी,स्ट्रीपड टायगर, प्लेन टायगर,कॉमन ग्रास येलो,कॉमन रोज,इंडियन क्रो,कॉमन वान्डरर,कॉमन पियरो, टॉनी कोस्टर, ब्यारनेट,डॅनिएड एगफ्लाय, स्विफ्ट,कॉमन सिल्व्हरलाईन, सेरूलिअन इत्यादी फुलपाखरांची तसेच पक्ष्यांची ओळख ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने यांनी करून दिली.
हिवाळी ‘बर्ड व बटरफ्लाय’ निरीक्षण उपक्रमाला राणी लक्ष्मी विद्यालयाचे विद्यार्थीनी सुहानी पाखमोडे,वंशिका शेंडे,नैना पाखमोडे, श्रेया देशमुख,राणू शामकुवर,खुशबू धांडे, साक्षी निर्वाण,गायत्री वैद्य, मनस्वी गभने,चारू वैद्य, सृष्टी वंजारी,चैतन्य वंजारी,इशान वैद्य, वेदांती वंजारी, ओम आगलावे,आर्या गायधनी, धनश्री देशमुख, आराध्या आगलावे,भूमेश्वरी पाखमोडे, हिमांशी पाखमोडे इत्यादींनी सहभाग नोंदविला. यानंतर सर्वांना इंजिनिअर राजेश गायधने यांच्या शेतात वेखंड शेतीचे फायदे,जीवामृत प्रयोग, हळद, आले,मोवरी,जवस शेतीचे प्रयोग,तसेच विविध औषधी वनस्पती उदा. शेंदरी,अडुळसा,समुद्रफेस,नागालँड, सिक्कीम हळद,इत्यादींचा परिचय करून देण्यात आला.