अन्…त्याने चोरली मित्राचीच बुलेट  पोलिसांनी आरोपीस केली अटक

54
अन्...त्याने चोरली मित्राचीच बुलेट  पोलिसांनी आरोपीस केली अटक

अन्…त्याने चोरली मित्राचीच बुलेट

 पोलिसांनी आरोपीस केली अटक

अन्...त्याने चोरली मित्राचीच बुलेट  पोलिसांनी आरोपीस केली अटक

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

घुग्घुस, 17 फेब्रुवारी
मित्राची बुलेट दुचाकी पळविणार्‍या आरोपीला घुग्घुस पोलिसांनी अटक केली. संदीप गुरुनाथ कागणे (26, रा. गडचांदूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
येथील सुभाषनगर परिसरातील क्रांतीकिरण लिंगया कनकुटला यांनी 4 फेब्रुवारी रोजी येथील नवनीत बार समोर आपला मित्र संदीप कागणे याला रॉयल एनफिल्ड बुलेटचीं चावी दिली. परंतु खूप वेळ होऊन सुद्धा बुलेट घेऊन गेलेला मित्र परत आला नाही. त्यामुळे क्रांतीकिरण कनकुटला यांनी बुलेट व संदीप कागणे याचा त्याच्या नातेवाईकांकडे शोध घेतला. परंतु, तो मिळून न आल्याने घुग्घुस पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कलम 406 अन्वये गुन्हा नोंद करून तपास सुरु केला. पोलिसांनी गुप्त माहिती आधारे आरोपीस ताब्यात घेऊन 50 हजार रुपये किंमतीची बुलेट (एमएच 34 बिटी 5351) जप्त केली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव, घुग्घुसचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत साखरे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे पथकाचे मनोज धकाते, प्रकाश करमे, महेंद्र भुजाडे, नितीन मराठे, विजय ढपकस, रवी वाभीटकर, महेश भोयर यांनी केली.