चिकनपाडा येथे पकडला गोवंषीयांनी भरलेले मिनी टेम्पो:
गोवंश हत्या थांबण्यात नेरळ पोलिसांना यश
✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞
नेरळ :- दि. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी मौजे चिकनपाडा साळोख रोडने जाणारा मिनी टेम्पो क्रमाक MH 05 EL 8619 हा कर्त्यव्यावर असणारे सहाय्यक फौजदार श्रीरंग किसवे यांनी पहिले असता त्यांना स्वंशय आला म्हणून गाडीचा पाठला करून गाडी अडवली चालक व क्लीनर याला गाडीची पाहणी करायची आहे असे सांगितले असता दोघांनी चकवा देत येथून पळ काढला. किसवे यांनी टेम्पोची पाहणी केली असता त्या मध्ये तांबडया रंगाची आखुड शिंगे असलेली मोठया पोटाची गाय अंदाजे वय 0७ वर्षे, काळया रंगागाचा आखुड शिगाचा बैल वय अंदाजे वय ५ वर्षे, काळ्या रंगाचे शिंगे फुटलेला वय अंदाजे दीड वर्षे, काळ्या तांबूस रंगाची शिंगे नसलेला कळवट गायव अंदाजे वय ६ महिने असे चार गोवंशीय जनावरे असल्याचे दिसले.
किसवे ह्यांनी हि बाब नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांना सांगितली विलंब न लावता त्यांनी चिकन पाडा येथे भेट देऊन पाहणी करून आरोपींनी आपसात संगनमत करून कोठून तरी गोवंषीय जनावरे स्वतःच्या फायाध्या करिता चोरून आणून त्यांना दाटीवाटीने कोंबून त्यांना चारा पाण्याची व्यवस्था न करता त्यांना क्रूर पणे वागणूक देऊन ती कत्तल करण्याच्या उदेशाने स्वतःच्या फायद्या करिता नेत असल्याचे समोर आले. म्हणून फरार आरोपी यांच्या वर ००२८/२०२४ ३७९-३४ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. त्यातील एका आरोपीला पकडण्यात नेरळ पोलिसांना यश आले आहे तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे. चारही गोवंशीय जनावरांना नेरळ येथील गोशाळा येथे रात्री सोडण्यात आले असून मिनी टेम्पो ताब्यात घेत्या आले आहे. किसवे यांच्या कामगिरी मुळे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे व प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी आपले कर्त्यव्य बजावण्या मुळे गोवंशीय हत्या करणारांचे धाबे दणादले आहेत. अधिक तपास शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनखाली पी. एस. आय. लोढे करीत आहेत.