अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरिता रमाई घरकूल योजनेच्या झोनस्तरीय शिबिराचा १७ तारखेपासून शुभारंभ

78

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरिता रमाई घरकूल योजनेच्या झोनस्तरीय शिबिराचा १७ तारखेपासून शुभारंभ

✍🏻मंजुषा सहारे ✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो 9373959098

नागपूर :- सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे नागपूर महानगरपालिका आणि सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरिता रमाई घरकूल योजनेच्या झोनस्तरीय शिबिराचा सोमवारी (ता.१७) शुभारंभ झाला. नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोन कार्यालयांमध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आले असून शिबिराच्या मुख्य शुभारंभ समारंभ आशी नगर झोन कार्यालयामध्ये घेण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त श्री. बाबासाहेब देशमुख, मनपाच्या मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग श्रीमती सुकेशनी तेलगोटे, मनपा कार्यकारी अभियंता श्री. कमलेश चव्हाण, श्री. अजय पाझारे, उपअभियंता श्रीमती वैजंती आडे आदी उपस्थित होते. धंतोली झोन कार्यालयातील शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी सहायक आयुक्त श्री. प्रमोद वानखेडे यांच्यासह झोनमधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.