जि.प. वर्ग शाळेत संविधानाचा जागर.
त्रिशा राऊत
क्राईम रिपोटर नागपुर जिल्हा प्रतिनिधि .मो 9096817953
नागपूरः कुही तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वग येथे विद्यार्थ्यांना तसेच पालकांना संविधानाचे महत्त्व कळावे याकरिता संविधानाचा जागर… या सदराखाली ‘संविधानाचे महत्व’ या विषयावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका नंदा घोडके तसेच व्याख्यानकर्ते अॅड. संगीता रामटेके सह प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक चंद्रकांत दडमल, गोवर्धन रामटेके, लक्ष्मण शहारे,विशाल मते, चंद्रशेखर बन्सोड व्यासपीठावर उपस्थित होते.
व्याख्यानकर्ते अँड. रामटेके यांनी संविधान निर्मितीची पार्श्वभूमी अगदी सोप्या भाषेत समजावून सांगत जीवनात संविधानाचे किती महत्त्व आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका नंदा घोडके यांनी केले याप्रसंगी बालाजी पाटील हायस्कूल वग आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वग येथील विद्यार्थ्यांची मोठ्या उपस्थिती होती. प्रमाणात