Arrival, Darshan and discourse of Acharyasri Mahashramanji at Lohia Vidyalaya Saundad.

लोहिया विद्यालय सौंदड येथे आचार्यश्री महाश्रमणजी यांचे आगमन, दर्शन व प्रवचन.

Arrival, Darshan and discourse of Acharyasri Mahashramanji at Lohia Vidyalaya Saundad.
गोपाल अग्रवाल, प्रतिनिधी(सडक अर्जुनी)

सौंदड:- लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,रामदेव बाबा अध्यापक विद्यालय व जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा, सौंदड येथे आचार्यश्री महाश्रमणजी यांचे दि.14 मार्च 2021 रोज रविवारला आगमन झाले.

यावेळी लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक-संस्थाध्यक्ष मा. जगदीश लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य- मधुसूदन अग्रवाल, प्राचार्य-गुलाबचंद चिखलोंढे, मुख्याध्यापक-मनोज शिंदे, हेडमिस्ट्रेस संयुक्ता जोशी तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी व्यवस्थेसाठी प्रयत्न केले.

आचार्यश्री महाश्रमनजी अहिंसा यात्रेतून सद्भावना,नैतिकता व नशामुक्तीचा संदेश जगभर देत आहेत. आचार्यश्री यांचे प्रवचन तसेच दर्शनाचा लाभ गावातील तसेच परिसरातील लोकांनी घ्यावा असे आवाहन जगदीश लोहिया यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here