जयभीम नगर पवई मधील झोपडपट्टी विभागातील नो पार्किंग झोन हटवण्या साठी नागरीकांचे निवेदन.

51

जयभीम नगर पवई मधील झोपडपट्टी विभागातील नो पार्किंग झोन हटवण्या साठी नागरीकांचे निवेदन.

पर्यायी व्यवस्था करा मगच कार्यवाई करा. नागरीकांची मागणी.

Citizens' statement for removal of no parking zone in slum area of ​​Jaybhim Nagar Powai.

✒️राज शिर्के प्रतिनिधी✒️
मुंबई/पवई:- जय भीम नगर, पवई मधील झोपडपट्टी विभागात राहणाऱ्या रहिवाशांना माघील अनेक दिवसा पासून मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. जय भीम नगर मध्ये कोणत्याही प्रकारची पार्किंग व्यवस्था नाही तसेच सर्व रहिवासी हे आपल्या मालकीचे वाहन बाइक, रिक्षा, टेम्पो तसेच कार गेल्या अनेक वर्षा पासुन रस्त्याच्या कडेला दुतर्फा पार्किंग करत आहेत आणि ह्या रस्त्याच्या कडेला दुतर्फा पार्किंग मुळे कोणत्याही वाहनांना तसेच अत्यावश्यक सेवांना त्रास होत नाही. तरी आमच्या जय भीम नगर मध्ये रात्रीच्या वेळी अंधारात येऊन नो पार्किंग चे फलक लावण्यात आले आहे. अगोदरच कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन च्या काळात लोकांचा काम धंदा पुर्णपणे ठप्प आहे आणि वरुन बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वाहतूक विभाग यांच्या संगनमताने कारवाई करु नये यासाठी सहआयुक्त, एस वार्ड, बृहन्मुंबई महानगरपालिका भांडुप पश्चिम मुंबई. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, साकीनाका वाहतूक विभाग, पवई मुंबई. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पवई पोलीस ठाणे, रामबाग मुंबई याना निवेदन देण्यात आले आहे.

पर्यायी व्यवस्था करा मग कारवाई करा. पर्यायाने जय भीम नगर समोरील मोकळ्या जागेत पार्किंग व्यवस्था करण्यात यावी आणि रितसर पणे कारवाई करावी हीच संपुर्ण जय भिम नगर मधील सर्व रहिवासी यांची मागणी आहे.

बृहन्मुंबई महानगर पालिका आणि वाहतूक विभाग यांची कारवाई टाळण्यासाठी योग्य अश्या प्रकारचे स्टिकर अथवा सुचना सुचवावे आम्ही त्याचे पालन करु.
सतीश ति बनसोडे