डी.वाय. पाटील महाविद्यालयात जागतिक ग्राहक हक्क दिन उत्साहात साजरा.

49

डी.वाय. पाटील महाविद्यालयात जागतिक ग्राहक हक्क दिन उत्साहात साजरा.

D.Y. World Consumer Rights Day celebrated at Patil College.

✒ पुणे जिल्हा प्रतीनिधी ✒

आकुर्डी:- डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटीचे, डी.वाय पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी येथे सोमवार दि. 15 मार्च रोजी वाणिज्य विभागाच्या वतीने जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, सचिव डॉ. सोमनाथ दादा पाटील, प्राचार्य मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मोहन वामन यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणात ग्राहक संरक्षण कायद्याचे थोडक्यात महत्व विशद केले. त्याचबरोबर या वर्षीच्या स्टिक प्रदूषण हाताळणे या जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या थीम विषयी मत व्यक्त केले. या व्याख्यानास प्रमुख व्याख्याते म्हणून वाणिज्य विभागाचे सहायक प्राध्यापक चेतन सरवदे हे होते. त्यांनी ‘ग्राहक संरक्षण कायदा 2019’ या विषयावर प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. सरवदे यांनी ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या संदर्भात माहिती देण्याबरोबरच आपण आपल्या हक्काविषयी जागरूक असले पाहिजे असे मत व्यक्त करताना, आपल्या हक्काची पायमल्ली होत असेल तर आपण दाद कुठे आणि कशी मागायची याविषयी मार्गदर्शन केले.

तत्पूर्वी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख, विजय गाडे यांनी कार्यक्रम घेण्याचा हेतू आणि उद्देश सांगितला. कार्यक्रम समन्वयक म्हणून विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. मुकेश तिवारी तसेच वाणिज्य विभागाचे प्रा. स्वप्निल ढेरे, प्रा. मोनिका जोगदंड, प्रा. ज्योती ढोबळे, प्रा. कुलकर्णी यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन प्रा. किशोर बोधले यांनी केले तर आभार प्रा. ऋतूजा कांबळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.