Deprived demand for good quality treatment of Marathi local employees at Hinganghat toll plazas.
Deprived demand for good quality treatment of Marathi local employees at Hinganghat toll plazas.

हिंगणघाट टोल नाक्यांवरील मराठी स्थानीक कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रतीची वागणूक देण्याची वंचीत ची मागणी.

कोरोणा काळात याच स्थानिक मराठी मुलांनी टोल नाक्यावर दीली होती सेवा.
स्थानीक कर्मचाऱ्यांना जातीवाचक केली जाणारी शिवीगाळ थांबवावी.

Deprived demand for good quality treatment of Marathi local employees at Hinganghat toll plazas.
✒ प्रशांत जगताप ✒

हिंगणघाट:- राष्ट्रिय महामार्गावरील दारोडा टोल नाक्यावरील स्थानीक कर्मचाऱ्यांना बाहेर राज्यातून आलेली टोल व्यवस्थापकांनकडून जातीवाचक शिवीगाळ करून खालच्या पातळीची वागणूक दिली जात असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीकडे टोल वरील कर्मचाऱ्यांनी केली असून, वंचित बहुजन आघाडीचे हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष डॉ.उमेश वावरे यांनी या तक्रारीची दखल घेत टोल नाक्यावर जाऊन टोल व्यवस्थापकांस निवेदन देत स्थानीक कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रतीची वागणूक देत त्यांना कामावरून कमी करू नये अशी मागणी केली. मागील अनेक महिन्यांपासून या टोल नाक्यावर स्थानिक अनेक कर्मचारी काम करत आहे कोरोना च्या काळात देखील याच कर्मचाऱ्यांनी या टोलनाक्यावर आपला जीव धोक्यात टाकून काम केलेले आहे मात्र आता बाहेर राज्यातून आलेली टोल व्यवस्थापन मंडळी या स्थानिक मुलांना कामावरून काढण्याचा डाव आखीत आहे त्यासाठी म्हणून काही स्थानिक कर्मचाऱ्यांना टरमिनेशन चा बॉण्ड भरून द्या अशी जबरदस्ती केली जात आहे. या मुलांना जातीवाचक शिवीगाळ देखील केली जात आहे असं स्थानिक टोल कर्मचाऱ्यांनी वंचित कडे निवेदनातून सांगितलं आहे.

Deprived demand for good quality treatment of Marathi local employees at Hinganghat toll plazas.

यावेळी वंचित चे डॉक्टर उमेश वावरे यांनी टोल नाक्यावरील व्यवस्थापनास निवेदनाद्वारे जातीवाचक शिवीगाळ करण्यासंदर्भात गुन्हा दाखल केला जाईल अशी चेतावणी दिली आहे. बाहेर राज्यातून आलेली टोल व्यवस्थापन मंडळी स्थानिक वाहनचालकांना त्रास देत आहे. वेगवेगळ्या प्रकारे टोलवर आर्थिक लूट केली जात आहे. स्थानिक युवकांना बेरोजगार करण्याची योजना या टोल व्यवस्थापनाकडून आखली जात असून बाहेर राज्यातील आपल्या हिताची मंडळी टोलनाक्यावर आणण्याचा त्यांचा डाव आहे मात्र वंचितच्या या चेतावणी नंतर आता टोल व्यवस्थापन स्थानिक कर्मचाऱ्यांनी विरोधात असे कट-कारस्थान करतील की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वर्धा जिल्हा उपाध्यक्ष राजेश खानकुरे शहर अध्यक्ष, दिलीप कहूरके, मनीष कांबळे, चारुदत्त आटे, हर्षल कुंभारे, आकाश फूलमाळी, प्रजित थुल,  अखील आत्राम, सुनिल करपाते, गणेश आश्राम, प्रणित कांबळे, गणेश शेडके, कुदन कुंभारे, प्रणय ढोके, संजय जामनकर, निखिल कळसकर, निखिल उमरे, प्रज्वल तामगाडगे, वैभव कुंभारे, सुरज बेताल, साहील जारोडे सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Deprived demand for good quality treatment of Marathi local employees at Hinganghat toll plazas.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here