बेला पोलीस स्टेशन मार्फत गरजू व गरीब महिला पुरूषांना मास्कचे वाटप व दंडात्मक कारवाई.
मुकेश चौधरी प्रतिनिधी
बेला:- नागपूर जिल्ह्य़ात कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामीण भागात शिरकाव होऊ नये म्हणून बेला पोलीस स्टेशन मार्फत गरजू व गरीब महिला पुरूषांना मास्कचे वाटप करण्यात आले आहे. ग्रामीण भागामध्ये नागरिक मास्कचा वापर करीत नसल्याचे नागपूर जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलिस अधीक्षक राहुल माकनिकल तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात तर्फे त्रिसूत्री कार्यक्रम अमलात आणण्यासाठी आदेश दिले आहेत.
कोरोनाचा वाढता रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मास्कचा वापर सॅनिटायझरचा वापर आणि सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचा वापर केल्यावरच आपण कोरोणा या रोगापासून बचाव करू शकतो. या अनुषंगाने बेला पोलिस स्टेशनचे ठाणेदार पंकज वाघोडे व पोलीस कर्मचारी यांनी गावामध्ये जनजागृती करून गरीब व गरजू लोकांना 150 मास्क वाटप करण्यात आले आहे .तसेच वारंवार सांगून सुद्धा व्यावसायिक ऐकत नसल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एकूण 33 मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करून सहा हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल केला आहे. यापुढेही दंडात्मक कारवाई करणार असल्याचे ठाणेदार यांनी सांगितली आहे.
हल्ली बेला परिसरात 27 कोरोणा रुग्ण अॅक्टिव्ह असून संसर्ग रोखण्यासाठी हे पाऊल उचलत असल्याचे सांगितले आहे सकाळ आणि संध्याकाळी बीना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे कुणीही बीना मास्क घराबाहेर पडू नये .असे आवाहन ठाणेदार पंकज वाघोडे यांनी केले आहे. सदर कार्यवाही मध्ये नायब तहसीलदार अश्विनी नंदेश्वर बेला व महसूल विभागाचे कर्मचारी ग्रामपंचायतचे सचिव बानाबाकोडे तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्ननिल दडमल, डॉक्टर विकास ढोक यांचे विशेष सहकार्य लाभत आहे