बी.एडच्या विद्यार्थ्यांना न्याय द्या- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

49

बी.एडच्या विद्यार्थ्यांना न्याय द्या- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

विद्यार्थ्यांना अडचणीत आणणार्‍या कुलगुरूंवर सरकारने कारवाई करण्याची मागणी

कोविड-१९च्या कालावधी मध्ये झालेल्या बी.एड परीक्षेचा निकाल लावण्यात यावा.

Give justice to B.Ed students- Former MLA Prof. Raju Timande
प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी 

हिंगणघाट :- मार्च २०२१ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथील बी.एडच्या विद्यार्थ्यांची कोविड-१९ च्या कालावधीत झालेल्या बॅकलॉगच्या पहिल्या सेमच्या परीक्षेचा निकाल दुसऱ्या सेमच्या निकालाप्रमाणे लावण्यात यावा.(परीक्षा ऑफलाईन पद्धतीने झाली होती) व नागपूर विद्यापीठाने बॅकलोग च्या पहिल्या सेम ची कोविड-१९च्या कालखंडात ऑफलाइन पद्धतीने परीक्षा झाली होती त्याचा निकाल लावण्यात यावा.तसेच नागपूर विद्यापीठाने पहिल्या सेमची परीक्षा दिनांक १८ व २० मार्चला घोषित केली असून ती रद्द करण्यात यावी. संपूर्ण विदर्भात कोविड-१९चे संक्रमण वर्तमान परिस्थितीमध्ये असताना नागपूर विद्यापीठातर्फे हेतुपुरस्सर पहिल्या शेवटची परीक्षा घोषित करून विद्यार्थ्यांना अडचणीत आणणार्‍या कुलगुरूंवर सरकारने कारवाई करण्याबाबत व नव्याने प्रवेश घेतलेल्या बी.एडच्या विद्यार्थ्यांची अध्याप परीक्षा झाली नाही ती परीक्षा करुणा महामारी मुळे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात यावी या विद्यार्थ्यांच्या गंभीर मागणीसाठी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री उदय सामंत,पदवीधर आमदार अभिजित वंजारी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठचे कुलगुरू यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मधील बी.एडच्या माजी विद्यार्थ्यांचे तसेच नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची पहिल्या सेमची परीक्षा कोविड-१९ मुळे रद्द करण्यात आली.

Give justice to B.Ed students- Former MLA Prof. Raju Timande

कोरोना संक्रमणाच्या आधी एक पेपर झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रात लोकडाउन लागले. त्यावेळेस परीक्षा रद्द करण्यात आली त्यानंतर सप्टेंबर २०२० या कोरोनाच्या कालावधीमध्ये पहिल्या सेमच्या बी.एडच्या माजी विद्यार्थ्यांची ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती परंतु विद्यापीठाने त्या परीक्षेचा निकाल न लावता ती परीक्षा रद्द करून २२ ते २६ फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. पुन्हा २२ फेब्रुवारीला एक पेपर झाला आणि २४ फेब्रुवारीला सर्व विद्यार्थी लांब अंतरावरून परीक्षा देण्याकरिता परीक्षा केंद्रावर पोहोचले. त्यावेळी विद्यापीठाने कोणतीही पूर्वसूचना न देता अवघ्या अर्धा ते एक तास आधी परीक्षा रद्द झाल्याची सूचना देण्यात आली. त्यामुळे लांब अंतरावरून आलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक फटका व मानसिक त्रास सहन करावा लागला.
या कोविड-१९ च्या कालावधीमध्ये बी.एडच्या माजी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न करता हजारो विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता जी परीक्षा सप्टेंबर २०२० मध्ये घेण्यात आली होती ती परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा न घेता त्या परीक्षेचा निकाल लावण्यात यावा तसेच नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची अद्याप परीक्षा झाली नाही त्यांची ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात यावी जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.

संपूर्ण विदर्भात कोविड-१९चे संक्रमण झाले असून वर्धा ,नागपूर आणि इतर जिल्हे लॉग डाऊन मध्ये आहे. नागपूर जिल्हा दिनांक 15 ते 21 मार्च पर्यंत कोविडच्या प्रादुर्भावाने कडकडीत लॉगडाऊन आहे. असे असताना नागपूर विद्यापीठ तर्फे पहिल्या सेमची झालेली परीक्षा हेतूपुरस्पर रद्द करून पुन्हा परीक्षा घोषित करणाऱ्या कुलगुरू वर सरकारने कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा व गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री उदय सामंत, आमदार अभिजित वंजारी यांना केली आहे.